Uncategorized

सणगर समाज विवाह सोहळात 11 जोडप्याच्या बांधल्या रेश्मी गाठी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर येथे सणगर समाजाने आयोजिलेल्या राज्यस्तरीय विवाह सोहळ्यात गोरज मुहूर्तावर 11 जोडप्यांच्या रेश्मी गाठी बांधण्यात आल्या.  समाजाच्यावतीने पंढरपूर येथे हा 4 था सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. श्रीसंत तनपूरे महाराज मठ येथे सायंकाळी नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
मंगळवार दि. 14 फेब्रुवारी रोजी विवाह सोहळ्यानिमित्त सकाळपासून श्रीसंत तनपुरे महाराज मठ येथे ‘लगीनघाई’ दिसत होती. प्रारंभी सकाळी 9 वाजात आलेल्या वर्‍हाडी मंडळींचे स्वागत करण्यात आले. यानंतर विवाह इच्छुक वधु-वरांचे विवाह नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. यानंतर ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपूरे यांच्या हस्ते विवाह सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  ह.भ.प. बद्रीनाथ महाराज यांनी उपस्थित समुदायाला सोळा संस्कार यामधील विवाह म्हणजे पवित्र संस्कार आहे. यावर प्रबोधन केले. दुपारी 12 वाजता समाजातील विवाह इच्छुकांचा वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला.
यानंतर वधु-वरांची थाटामाटात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.  सायं. 6:20 मि. या गोरस मुहूर्तावर  11 वधुवरांचा वैदीक पद्धतीने विवाह संपन्न झाला. वधू-वरांसाठी समाजावतीने हळदीचा, लग्नाचा संपूर्ण पोशाख,  सौभाग्याचे लेणी मनी मंगळसूत्र, जोडवी, हळदीचे हार, लग्नाचे हार, तसेच प्रत्येक जोडप्यास प्रथम कन्या झाल्यास अठरा वर्षासाठी 31 हजाराची ठेव पावती देण्यात येणार आहे. यावेळी या नव वधूवरांचा शुभ आशिर्वाद देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो समाज
यावेळी अखिल भारतीय सनगर समाज मठ ट्रस्ट अध्यक्ष सतिश रामचंद्र सादिगले यांनी कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश हेतु समाजा विषयी असलेले सामाजीक भान व गरज या विषयी मार्गदर्शन केले. यानंतर समस्त दैव सनगर मंडळी चे अध्यक्ष उमेश नामदेव ढोबळे यांनी सहभागी वधूवरांच्या पालकांचे व मेळाव्यासाठी सहकार्य केलेले सर्व समाज बांधवाचे आभार मानले.
या मेळाव्यात उपस्थित समाज बांधवांचे स्वागत स्वागताध्यक्ष कैलास कारंडे यांनी व या सोहळ्यातस उपस्थितांचे आभार  स्वागताध्यक्ष धनंजय कारंडे यांनी मानले.
या मेळाव्यात उपस्थित समाज बांधवांचे स्वागत स्वागताध्यक्ष कैलास कारंडे यांनी व या सोहळ्यातस उपस्थितांचे आभार  स्वागताध्यक्ष धनंजय कारंडे यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी समस्त दैव सनगर मंडळी पंढरपूरचे उपाध्यक्ष सचिन कारंडे, संजय खुळपे, शक्ती कारंडे,  भारत कारंडे, दत्तात्रय लिमकर, दिलीप पालसांडे, देवेंद्र गोंजारी, सुनिल इकारे, प्रसिध्दी प्रमुख दत्तात्रय कमले, शशिकांत कमले, ज्ञानेश्वर सादिगले, अंकुश राऊत, हरिभाऊ नडे, सुभाष कमले, संतोष खुळपे, पांडुरंग ढोबळे, राजेंद्र सादिगले, दगडु खुळपे, विठ्ठल कारंडे, लक्ष्मण कारंडे, दिलीप कमले, अ‍ॅड. मंगेश राऊत, अ‍ॅड. सदानंद कारंडे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close