Uncategorized

एमपीएससी मधून बालविकास प्रकल्प अधिकारी वर्ग 1 पदी निवड झालेबद्दल सुमित रणदिवे यांचा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी सुरेश विष्णुपंत रणदिवे यांचे सुपुत्र सुमित रणदिवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून बालविकास अधिकारी वर्ग 1 पदी निवड झालेबद्दल फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने त्यांचे निवासस्थानी त्यांचा सत्कार अध्यक्ष सुनील वाघमारे यांचे हस्ते करण्यात आला.
सुमितचे प्राथमिक शिक्षण आदर्श प्रशाला येथे झाले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विवेक वर्धिनी विद्यालय येथे झाले. B E मॅकॉनिकल सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज पुणे येथे झाले. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करुन सुमितने एमपीएससी सोबतच युपीएससीची सुद्धा परीक्षा दिली असून त्याचा निकालही लवकरच लागेल.
सुमितचे मोठे बंधू संदीप दोन वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेतून वन अधिकारी म्हणुन रुजू झाले आहेत.
सर्वसामान्य परस्थितीतुन रणदिवे कुटुंबातून दोन अधिकारी झाले बद्दल आई वडिलांचे विशेष कौतुक होत आहें. सत्कार प्रसंगी सुमितचे आई,वडील, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, दादासाहेब दोडके सर, श्रीकांत कसबे, नानासाहेब लोखंडे, दत्तात्रय कांबळे सर, चंद्रकांत सातपुते सर आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close