Uncategorized

कु. किरण सर्वगोड यांची कनिष्ठ अभियंता पदी निवड झालेबद्दल फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-भीमशक्ती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष उमेश सर्वगोड यांच्या भगिनी किरण भगवान सर्वगोड हिची बुलढाणा जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झालेबद्दल फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे वतीने त्यांचे निवासस्थानी अध्यक्ष सुनील वाघमारे सत्कार यांचे हस्ते शाल, बुके, व संविधानाची प्रत देऊन करण्यात आला.
कु. किरणचे प्राथमिक शिक्षण नगरपरिषद शाळा नंबर 9 येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे झाले. सिव्हिल डिप्लोमा स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज गोपाळपूर B E सिव्हिल सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज कोर्टी पंढरपूर येथे झाले.
सर्वसामान्य परस्थितीतुन यश प्राप्त केलेबद्दल किरण व तिचे आई वडिलांचे विशेष कौतुक होत आहें. सत्कार प्रसंगी किरणचे वडील, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, दादासाहेब दोडके सर, श्रीकांत कसबे, नानासाहेब लोखंडे,सुकदेव माने चंद्रकांत सातपुते सर आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close