फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने पंढरपूर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा विजेते, मुख्याध्यापक व पत्रकार सन्मान समारंभ संपन्न!
26नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त घेतल्या होत्या निबंध स्पर्धा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-२६ नोव्हेंबर २०२३ भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित पंढरपूर तालुकास्तरीय निबंध स्पर्धा विजेते,मुख्याध्यापक व पत्रकार सन्मान समारंभ रविवार दि.०७ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता स्वेरी इंजिनियरींग कॉलेज, रांझणी-गोपाळपूर रोड, ता. पंढरपूर संपन्न झाला.

यावेळी राजु खरे उद्योजक, पंढरपूर,अभिजीत (आबा) पाटील चेअरमन श्री विठ्ठल सहकारी . सा. कारखाना, गुरसाळे,अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधि पंढरपूर विभाग,डॉ. प्राचार्य. बी..पी. रोंगे( स्वेरी, इंजिनीरिंग कॉलेज )प्रा. सुभाषराव माने सर मा. अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, मारूती लिगाडे गटशिक्षण अधिकारी पंढरपूर, प्रणिताताई भालके, आदी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनिल वाघमारे अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, हें होते.
भारतीय संविधान दिन निबंध स्पर्धेत 53शाळेच्या 2600विदयार्थी विध्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.त्या सर्व विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेत खालील विध्यार्थ्यानी नंबर मिळविले
गट क्रमांक १– इ. १ ली ते ४ थी:-
प्रथम क्रमांक-जय सचिन साळवे,आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर
व्दितीय क्रमांक -विभागून तेजश्री शरदचंद्र चटे, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर,सुनिल ढेकळे जि.प.प्रा.शाळा कोरके वस्ती नं १ भोसे
तृतीय क्रमांक– विभागून शर्वरी गणपत कळसुले, जि.प.प्रा. केंद्र शाळा गादेगांव विरोचन सिध्देश्वर करळे जि.प.प्राथ शाळा सुगांव भोसे
उतेजनार्थ– अजिंक्य अनिल अटकळे जि.प.प्राथमिक शाळा शेगांवदुमाला,चिन्मय जगदिश डांगे विद्याविकास मंडळाचे प्राथमिक विद्यालय पंढरपूर,प्रांजली विठठल कोलगे,जि.प.प्रा. केंद्र शाळा चिचणी,हर्ष श्रीकांत चंदनशिवे विवेक प्राथमिक विद्यालय पंढरपूर,स्वराज दत्तात्रय जाधव जि.प.प्रा.शाळा बोहाळी,
गट क्रमांक २ —इ. ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक–अपूर्वा अतुल चव्हाण,श्री दत्त विद्यामंदिर व क. महाविद्यालय सुस्ते
व्दितीय क्रमांक विभागून-मृण्मयी हणमंत पवार, यशवंत विद्यालय पंढरपूर,समिक्षा संभाजी कोळेकर,वामनराव माने प्रशाला व क. महाविद्या भैरवनाथ वाडी
तृतीय क्रमांक- विभागून -आरती दत्तात्रय यलमार,जि.प.प्रा.शाळा बागलवस्ती वाखरी,पायल विजय जाड,ज्ञानेश्वर माउली विद्यालय खरसोळी पंढरपूर
उतेजनार्थ – राधिका प्रकाश पवार, साधना विद्यालय व क. महाविद्यालय तावशी, प्रेरणा दत्तात्रय देवळे श्री दलिंग विद्यामंदिर व भास्कर आप्पा क. महाविद्या. चळे,वैष्णवी नितिन पासले, वसंतराव काळे प्रशाला व क. महाविद्यालय वाडीकुरोली,बाबा लोखंडे,श्री दुर्गा शिशुविहार व प्राथमिक शाळा इसबावी,मृण्मयी किरण वहिल,द. ह. कवठेकर प्रशाला पंढरपूर
गट क्रमांक ३ –इ. ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक विभागून-सिमरन शकील नदाफ, कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय पंढरपूर, आर्या मलिकार्जुन माळी,कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर
व्दितीय क्रमांक विभागून–समृध्दी बापूराव पाटील,श्री भैरवनाथ विद्यालय कान्हापुरी,सानिका प्रकाश जबडे,आपटे उपलप प्रशाला पंढरपूर
तृतीय क्रमांक- विभागून-सुहानी संजय भोसले श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय रोपळे बु ,साहिल बबन ननवरे,गौतम विद्यालय पंढरपूर
उत्तेजनार्थ – लक्ष्मण रावसाहेब वाघमोडे,आचार्य दोंदे विद्यालय ओझेवाडी,हर्षा महादेव ढवळे,मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर,विशाखा विनायक दिक्षीत,पटवर्धन कुरोली प्रशाला व क. महाविद्यालय पट. कुरोली,साक्षी सोमनाथ नेहतराव,मातोश्री सो सरुबाई माने विद्यालय व क. महाविद्या भटुंबरे,श्रावणी अनिल लिंगे,यशकिर्ती विद्यालय पंढरपूर,
आदी स्पर्धेकांनी यश संपादन केले. या विजेत्यांचे मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, शाल, ट्रॉफी व बुके देऊन सन्मान करण्यात आला.या निबंध स्पर्धेचे परीक्षक राजेंद्र पाराध्ये सर,अमोल चंदनशिवे सर,सुधीर मागाडे सर यांचाही गौरव करण्यात आला.
तसेच सहभागी सर्व प्रशालेतील मुख्यध्यापकांचा सन्मानपत्र, बुके, शाल देऊन सन्मान करण्यात आला.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा शाल, बुके, लिखाणाचे पॅड, व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक संविधान उद्धेशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी स्वेरी महाविद्यालय सभागृह विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, पत्रकार यांच्या उपस्थितीने खचाखच भरले होते. स्वेरीच्या वतीने अल्पपोहारची सोय केली होती.
तर कार्यक्रमाला उद्योजक राजू खरे यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता माशाळ मॅडम यांनी केले तर प्रास्तविक निबंध स्पर्धा प्रमुख डॉ.सिकंदर ढवळे यांनी केले. तर आभार दादासाहेब दोडके सर यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी उपाध्यक्ष अॅड. किर्तीपाल सर्वगोड,भालचंद्र कांबळे, सचिव जितेंद्र बनसोडे,सहसचिव अॅड. किशोर खिलारे डी.एन. दोडके सर खजिनदार सह खजिनदार डॉ. सिकंदर ढवळे, यांचेसह सर्व कार्यकारिणी सदस्य व सल्लागार सुभाष ढवळे सर, एल. एस. सोनकांबळे, बा. ना. धांडोरे, आर. पी. कांबळे, श्रीकांत कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Nune



