Uncategorized

मोहोळच्या रणांगणावर शिंदे गटाकडून “राजाभाऊ खरे” यंदा मैदान गाजवणार….!

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

मोहोळ :(दादासाहेब निळ )-लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यंदा एकाच मांडवाखाली होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सध्या उमेदवार मतदाराशी संपर्क वाढू लागल्याचे चित्र आहे.
पुरोगामी विचाराच्या वाटेवरून चालणाऱ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणावर यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार स्थापन झालेल्या शिवसेना शिंदे गटा कडून उद्योग क्षेत्रामध्ये कारकीर्द गाजवणारे राजाभाऊ खरे मोहोळच्या आखाड्यात उतरणार असून मोहोळचे मैदान राजाभाऊ गाजवणार…! वाजवणार….!! मोहोळ तालुक्यावर भगवा फडकवणार अशी चर्चा सध्या शिवसैनिक आणि नागरिकांमधून होत आहे.
राजकारणाला समाजसेवेची जोड देत अनेक गोरगरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी धावून जाणारा नेता म्हणून राजाभाऊ खरे यांची खरी ओळख..!
संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे जे “का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, “”देव तेथेची जाणावा साधू तोची ओळखावा”
संत तुकाराम महाराजांनी दाखवलेल्या वाटेवरून राजाभाऊ खरे यांचा प्रवास सुरू असून सर्वसामान्य माणसाची सावली म्हणून ते काम करत असल्यामुळे सध्या मोहोळ तालुक्यामध्ये अनेक गरजूंना ते मदतीचा हात देताना दिसत आहेत.
मोहोळ तालुका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आणि त्यांच्या विचारधारेनुसार काम करणारा तालुका असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये महायुतीला पोषक वातावरण आहे. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजाभाऊ खरे यांना कामाला लागा.अशा सूचना दिल्यामुळे आणि विद्यमान आमदार यशवंत माने पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे भाजपकडे मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेताहेत.
त्याचबरोबर मागील त्याला पाणी आणि मागील त्याला रस्ता अशा प्रकारची योजना त्यांनी निवडून येण्याच्या अगोदरच सुरू केल्यामुळे राजाभाऊंच्या काम करण्याच्या मुळे त्यांची मतदारसंघांमध्ये मोठी चर्चा होत असताना सर्वसामान्य माणसांचा त्यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राजाभाऊंना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे राजाभाऊ मोहोळ मतदार संघ आणि संघातील वाड्यावर या पिंजून काढत आहेत.
त्यांच्या समवेत चरण राज चौरे आणि इतर निष्ठावंत शिवसैनिक खांद्यावर भगवी उपकरणे घालून मतदार संघातील वातावरण ढवळून काढून राजाभाऊंसाठी भगव वादळ निर्माण करत आहोत.निवडणुकांसाठी अजून कालावधी असला तरी सुद्धा राजाभाऊ खरे मात्र कामाला लागल्यामुळे आणि त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्यामुळे शिवसैनिक कामाला लागल्याचे दिसत आहे.राजाभाऊ खरे यांनी आजपर्यंत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून काम केल्यामुळे त्यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्यामुळे यंदाचा मोहोळ विधानसभेचा आखाडा ते गाजवतील आणि भगवा फडकवतील अशा प्रतिक्रिया सध्या मोहोळ तालुक्यातील नागरिकांमधून उमटत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close