पांचाळ सोनार समाज अध्यक्षपदी मुकुंद वेदपाठक यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- येथील पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी मुकुंद वेदपाठक यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर पंढरपूर येथे संपन्न झालेल्या पंढरपूर शहर समाजाच्या सहविचार सभेमध्ये ही निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षपदी समाजाचे मार्गदर्शक डॉ. मदन क्षीरसागर हे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर शहर पांचाळ सोनार समाजाची कार्यकरणीची निवड बिनविरोध करण्यात आली त्यामध्ये.उपाध्यक्षपदी मुकेश पंडित,सचिवपदी शशिकांत पोतदार, सहसचिव सारंग महामुनी,खजिनदार सप्नील कमसल,सुमित पारखे,विशाल दिक्षित यांची निवड करण्यात आली तसेच पंढरपूर शहर मार्गदर्शक समितीची निवड करण्यात आली त्यामध्ये अरविंद मंगसुळकर, गजेंद्र घोडके, आनंद उपळकर अनंत कासेगावकर,केशव महामुनी मनोज कासेगावकर, बसवराज पोतदार, गणेश पंडित,रमेश महामुनी यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी पंढरपूर येथील पांचाळ सोनार समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.