सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन पंढरपूर येथे संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन पंढरपूर येथे संपन्न झाला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष समाधान जाधव व गौतम धनवडे तालुका संघटक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले व निलम बंगाळे व हणमंत बंगाळे यांनी यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पंचशील त्रिशरण तसेच बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा (पश्चिम) संघटक राजेंद्र सर्वगोड यांनी चैत्यभूमीची स्थापना यशवंतराव आंबेडकर साहेबांनी कशाप्रकारे केली याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच केंद्रीय शिक्षक जितेंद्र आठवले यांनी मनोगत करताना सांगितले की बौद्ध धम्मा साठी संस्कार वर्ग संस्कार पाठ कशाप्रकारे असावे तसेच सामनेर व बौद्धाचार्य निर्मिती व्हावे यासाठी प्रयत्न केले.
यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष राहुल सर्वगोड हणमंत बंगाळे राजेंद्र सर्वगोड जितेंद्र आठवले समाधान जाधव गौतम धनवले नीलम बंगाळे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच शेवटी शरणतय गाथा घेवण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली घेऊन