Uncategorized

प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या सेवानिवृत्ती निमित्त माजी विद्यार्थी व सहकारी यांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक शिवयोगी  मंगल  कार्यालय येथे  रविवार  दि.18 रोजी सत्कार करण्यात आला. पाराध्ये यांनी 35 वर्षे दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षक, प्राचार्य म्हणून काम केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती पंढरपूरचे माजी सभापती वामनराव माने हे होते.

त्यांनी पाराध्ये हे एक उत्कृष्ट,उपक्रमशील शिक्षक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे हे होते त्यांनी पाराध्ये यांच्या कार्याचा गौरव करून शिक्षक हे देशाचे उद्धारक असतात असा उल्लेख केला.या प्रसंगी पाराध्ये यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच दीपस्तंभ या गौरव अंकाचे ही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पाराध्ये यांनी सांगितले की मला संस्थेने सर्व काही भरभरून दिले आहे .माझे विद्यार्थी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत यामध्ये मी समाधानी आहे.

प्राचार्य आर. डी. पाराध्ये सर (विवेक वर्धिनी विद्यालय व व कनिष्ठ महाविद्यालय )सेवानिवृत्त झालेबद्दल त्यांचा गौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे, श्रीकांत कसबे, सुनील वाघमारे व जैनुद्दीन मुलाणी

कार्यक्रमाचे नियोजन डॉ.बिभीषण रणदिवे, बाळासाहेब शिंगाडे, प्राचार्य मोहम्मद शेख ,अडगळे एस. व्ही, शशिकांत पोद्दार, सर्जेराव पडळकर, चंद्रकांत सातपुते, मारुती माने, दत्तात्रय अवघडे, डॉ किशोर खिलारे,राजूभाई मुलाणी,अर्चना कुंचे, सुहास मासाळ व माजी विद्यार्थी परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी केला होता. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने , अखिल भारतीय बिल्डर्स असोसिएशन अध्यक्ष दत्ता मुळे,आप्पासाहेब चोपडे, किसन सरवदे, सिने अभिनेता राहुल हजारे, जोशबा टाईम्सचे संपादक  श्रीकांत कसबे, प्रबुद्ध परिवाराचे  सुनील वाघमारे. साहित्यिक प्रा. शिवाजीराव वाघमारे, युवा राष्ट्रचेतनाचे संपादक   जैनुद्दीन मुलाणी, माजी प्राचार्य भाऊसाहेब  कांबळे, भारत  खिलारे  सर, दत्तात्रय कांबळे सर,सर्व शिक्षक ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close