Uncategorized

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात एम.एस्सी. संगणकशास्त्र या नवीन अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाची मान्यता

  • जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

    -श्रीकांत कसबे

    पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून एम.एस्सी. संगणकशास्त्र या अभ्यासक्रमाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाल्याचे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील एक नामांकित स्वायत्त महाविद्यालय म्हणून नावाजलेल्या या महाविद्यालयाला एम.एस्सी. संगणकशास्त्राबरोबरच एम.एस्सी. संगणकशास्त्र, एम.एस्सी. गणित, बी.ए. भाग – २ मानसशास्त्र आणि बी.ए. इंटायर ‘मल्टीमिडिया अँड मास कम्युनिकेशन’ हे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
    एम.एस्सी. संगणकशास्त्र या विषयाच्या शिक्षणासाठी पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, येथे जावे लागत होते. हा अभ्यासक्रम पंढरपूर येथील महाविद्यालयात सुरु झाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. त्याचबरोबर मानसशास्त्र आणि मल्टीमिडिया अँड मास कम्युनिकेशन या नवीन व महत्त्वपूर्ण विषयांना मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नावाजलेल्या स्वायत्त महाविद्यालयाच्या नावलौकिकात यामुळे भर पडली आहे. गेल्या वर्षी पाच विषयात पदव्युत्तर कोर्स या महाविद्यालयाने सुरु केले आहेत. विद्यापीठात असणाऱ्या शिक्षणाच्या सर्व सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध झाल्या आहेत. याबद्दल पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला होता. या अभ्यासक्रमांना पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
    .
Reply
Reply all
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close