भ्रष्टाचाराचे मुळ हे पंचायत राज व्यवस्थेतच – गणेश घाटगे

गणेश घाटगे – कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र (युवक)पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
वडगाव( ता.हातकणंगले):- नागरिकांना लोकशाहीचे शिक्षण देणारी ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते परंतु,गेल्या वीस वर्षापासूनचा जर ग्रामपंचायतींचा लेखा जोखा बघितला तर ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज्य व्यवस्थेचा पाया असली तरी इथं लोकशाहीच्या शिक्षणा ऐवजी भ्रष्टाचाराचे शिक्षणच दिले जाते की काय ? अशी भीती पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र (युवक) कार्याध्यक्ष गणेश घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात याचे स्पष्टीकरण देताना गणेश घाटगे यांनी म्हटले आहे की, मागासवर्गीयांचा विकास करण्यासाठीचा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नापैकी 15 टक्के निधी पश्चिम महाराष्ट्रात कुठेही वापर करून खर्ची टाकलेला दिसत नाही. याच्या उलट तो निधी इतरत्र वर्ग केला जातो ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे शिवाय एखादे विकासाचे काम दाखवले जाते ते कागदोपत्री परंतु प्रत्यक्षात याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठलीही इमारत दिसत नाही याच्यामध्ये गावचे सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी हे सगळेच एकमेकांना मिळालेले असल्याचे म्हटले आहे.
शेवटी प्रसिद्धी पत्रकात गणेश घाडगे यांनी इशारा दिला आहे की, पुरोगामी संघर्ष परिषद पश्चिम महाराष्ट्रामध्ये “मिशन ग्रामपंचायत भ्रष्टाचार” राबवणार आहे.