Uncategorized

आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीजचा प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

कामगारांना पंधरा दिवसाचा बक्षीस पगार -सभापती सोमनाथआवताडे_

 

कामगारांना पंधरा दिवसाचा बक्षीस पगार -सभापती सोमनाथआवताडे_

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

प्रतिनिधी: आवताडे शुगर अँन्ड डिस्टिलरीज चा प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, मारापुरचे सरपंच विनायक यादव, कार्यकारी संचालक मोहन पिसे, मुख्य शेती अधिकारी रमेश पवार, संपत अटकळे,उप शेती अधिकारी वसंत लेंढवे, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे , मा मिस्टर संचालक भारत निकम, मा.तज्ञ संचालक विजय माने, पप्पू काकेकर, नंदूरचे मा.उपसरपंच परमेश्वर येणपे, सतीश पाटील आदि प्रमुख मन्यावर उपस्थित होते.

कारखान्याचे मार्गदर्शक तथा पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांचे कुशल मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार यांच्या अथक परिश्रमामूळे आवताडे शुगरने प्रथम गळीत हंगामामध्ये अल्पावधीत 4 लाख 2 हजार 555 इतके गाळप केले करून 3 लाख 80 हजार 300 पोत्यांचे साखर उत्पादन केले अशी माहिती आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


या गळीत हंगामामध्ये ट्रक/ट्रँक्टर, डंपीग व बैलगाडी सर्वात जास्त वाहतूक करणाऱ्या ऊस वाहतूकदारांमध्ये प्रथम क्र. दामाजी शामराव बंडगर, अंबादास पांडुरंग लवटे, गोविंद बाबासाहेब खेंगरे, द्वितीय क्र. दादासो राजाराम लेंडवे, अनिल शिवाजी घोळवे, मनोहर त्रिबंक जाधव, तृतीय क्र. सिध्दलिंग सुरेश कोळी, सुनिता बाबासो माने, लिंबाजी दादाराव जाधव, यांनी सर्वात जास्त वाहतूक ऊसस वाहतूक केली असल्याने ठेकेदार यांना उत्तेजनार्थ बक्षिस बहाल करुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सभापती सोमनाथ आवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज आवताडे शुगरने कामगार वर्गाच्या कार्यकुशल कामगिरीमुळे प्रथम गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडू शकलो असले बाबतचे सांगून कामगारांना पंधरा दिवसांचा बक्षिस पगार देऊन त्याचा ही सन्मान ठेवण्याचे काम आवताडे शुगर करत असल्याचे सांगितले.

अनेक अडचणींचा सामना करत कोणताही राजकीय आकसभाव मनामध्ये न ठेवता सर्व सामान्य शेतकऱ्यांचा ऊस गळीतास आणून शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा देण्याचे काम आवताडे शुगरच्या माध्यमातून झाले आहे. इतर साखर कारखान्यापेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्नही आवताडे शुगरच्या माध्यमातून झाला आहे.गळीत हंगाम सुरू असताना कारखाना कार्यस्थळावर आरोग्य तपासणी शिबिर घेऊन कारखान्यातील कर्मचारी व ऊस तोडणी कामगार यांचे आरोग्य जपण्याचे काम केले. तसेच रक्तदान शिबीर , वृक्षलागवड,शालेय साहित्याचे वाटप यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली.महाराष्ट्र -कर्नाटक सिमेवर बंद आवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यास उर्जित आवस्थेत आणून हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व व्यवसायिक-लघू व्यवसायिक यांना कारखान्याच्या माध्यमातून चालना देण्याचे काम आवताडे शुगर ने केले.दरम्यानच्या काळात आवताडे बंधूवर अनेक प्रकारचे आरोप करत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला परंतु त्याला न जुमानता आवताडे बंधूंनी शेतकरी व सर्व सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना अतिशय उत्तम प्रकारे चालवून शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले.

यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर दिलीप जाधव, चिफ केमिस्ट् मोहन पवार, फायनान्स मॅनेजर रघूनाथ उन्हाळे, डेप्युटी चिफ इंजिनिअर श्रीकांत रोंगे, इलेक्ट्रिक मॅनेजर सुरेश निर्मळ, एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, आयटी मॅनेजर मिनहाज शेख, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, साहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, वाह्नठेकेदार व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढीस आवताडे शुगर ने आधुनिक पद्धतीने तयार केलेले कल्चर मिश्रीत कंपोस्ट खत भरनीसह प्रति टन 1050/- या अत्यल्प दरामध्ये कारखाना स्थळावर उपलब्ध केलेला आहे तरी यांचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी व व्यवसायिकांनी घ्यावा (मोहन पिसे -कार्यकारी संचालक, आवताडे शुगर)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close