डॉ.स्वाती कैलास कांबळे बीएएमएस उत्तीर्ण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
लातूर :-कैलास कांबळे सर रा.दस्तापुर ता.लोहारा हल्ली मुक्काम लातूर यांची कन्या डॉ.स्वाती कैलास कांबळे ही आज डॉक्टर झाली. तिचे एसएससी चे शिक्षण राजीव गांधी विद्यालय लातूर येथे झाले आहे तर एचएससी चे शिक्षण सोनवणे कॉलेज लातूर येथे झाले आहे आणि BAMS चे शिक्षण मातोश्री आश्राबाई दराडे आयुर्वेदिक कॉलेज येवला जि.नाशिक येथे झाले आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कैलास कांबळे प्राथमिक शिक्षक अतिशय जिद्द, चिकाटी, मेहनत, आणि कष्टाच्या बळावरती आज आपल्या मुलीला डॉक्टर बनविले आहे. अतिशय आनंदाची व प्रेरणा देणारी बाब आहे .खरंच आज मनापासून आनंद वाटला, की डॉ. स्वातीने तिच्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. डॉक्टर स्वाती हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे तिच्या सह तिच्या आई वडिलांचे ही कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे. बनसोडे परिवार आणि परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने मी तिला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



