सुरज साठे यांच्या “आसूडाचा घाव” या कथासंग्रहाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित
मा.मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण बाबा व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
वाटेगाव:- महाराष्ट्रातील तमाम वाचक वर्गाच्या
आशीर्वादाने व सहकार्याने अतिशय अल्पावधीत माझा “आसूडाचा घाव” या पुस्तकाची द्वितीय कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाली.बऱ्याच लोकांनी पुस्तकावर टीका केल्या. कदाचित माझे काहीतरी चुकले ही असावे पण त्यांनी पुस्तक वाचून चूक लक्षात आणून दिली. त्याबद्द्ल त्यांचे खूप खुप आभार असे मत लेखक सुरज साठे यांनी व्यक्त केले.
काही लोकांनी काही म्हणण्यापेक्षा खूप जास्त लोकांनी पुस्तकाचं खूप सार कौतुक केलं. कित्येकांनी एवढं जबरदस्त समीक्षण पुस्तकाचं केलं. की एकवेळ मला ही शंका वाटू लागली की हे सगळ मीच लिहिलं आहे का. परंतु स्तुतीला भाळून जाणारा मी नाही. माझा जो लढा आहे तो सुरूच आहे.
मी जातीने मातंग (मांग) आहे. सुरुवातीला मला वाटल की माझं पुस्तक सगळ्यात जास्त मी ज्या जातीत जन्माला आलोय त्या जातीतील लोक मोठ्या संख्येने वाचतील. पण इथे माझा अंदाज खोटा ठरला. आसूडाचा घाव हे पुस्तक समाजातील सर्वच स्तरातून वाचले गेले. आणि सर्वांची अशी प्रतिक्रिया होती की पिढ्यानपिढ्या दुःख, दारिद्र्य, उपेक्षा आणि शोषणाचा बळी ठरलेल्या समस्त मानव जातीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण एक व्यापक लढा उभा केला पाहिजे. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. कारण कुठेतरी अस वाटत होत की जाती अंताच्या चळवळीला कुठेतरी बळ मिळतंय.
बऱ्याच लोकांनी मला फोन केले आणि सांगितले की तुमचे आसूडाचा घाव हे पुस्तक वाचून आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडलेलं आहे. तुमच्या पुस्तकाने आमचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय. अशा प्रतिक्रिया आल्या. खरतर मला माझ्या लिखाणाचं चीज झाल्यासारखं वाटलं. मी प्रसिद्धीसाठी कधीच लिहिले नाही. पण माझ्या पुस्तकांमधून थोड का होईना पण समाजात परिवर्तन घडल पाहिजे. हा विचार घेऊन मी लिहीत असतो. आणि या सर्वच लोकांच्या अशा प्रतिक्रिया आणि त्यांनी स्वतःमध्ये घडवलेला बदल या सर्वच गोष्टी माझ्या लिखाणाला ताकद देत असतात. काही लोकांनी स्वतः ची आर्थिक परिस्थिती कुमकुवत असताना पन्नास, शंभर, दोनशे अशा प्रती खरेदी केल्या व शाळांमध्ये, समाजप्रबोधन कार्यक्रमात त्या वाटल्या. खरतर पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघणे हे माझे यश नाही तर तुम्हा सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे आणि खरतर तुम्हा सर्वांमुळेच दुसऱ्या आवृत्तीचा टप्पा गाठता आला. इथून पुढच्या काळात देखील तुम्हा सर्वांचे असेच आशीर्वाद व सहकार्य लाभेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार..!! अशा भावना सुरज साठे यांनी व्यक्त केल्या.
“आसूडाचा घाव” सुरज साठे
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे
जन्मभूमी वाटेगाव
9370626619