सामाजिक संघटनांचे वय स्थापनेवर नसून सामाजिक कामावर असते–राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे

*इस्लामपूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, अविनाश कांबळे, प्रा कवळे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
इस्लामपूर :-छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुरोगामी विचारावर आधारित अनेक आंबेडकरी चळवळीची आपत्य जन्माला आली. परंतु महाराष्ट्रात प्रतिगामी विचारा समोर या सगळ्या चळवळींनी दग्धभू धोरण स्वीकारल्यामुळे प्रतिगाम्यांच्या हल्ल्याच्या अगोदरच पुरोगामी विचारांचा पराभव झाल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले.ते इस्लामपूर येथे संघटनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. सुभाष वायदंडे म्हणाले की, कोणत्याही सामाजिक संघटनेचे वय हे संघटनेच्या स्थापनेवर नसून सामाजिक कार्यावर अवलंबून असते त्यामुळे सामाजिक लढा अविरत ठेवणे गरजेचे आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, राज्य संसदीय मंडळाचे सदस्य दादासाहेब कांबळे,महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ.सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे,पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा कु. नयना लोंढे,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू(करण)कांबळे,शहर जिल्हाध्यक्षा शीला बनसोडे,यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक वरिष्ठ जिल्हाध्यक्षा सौ वनिता सोनवले यानी तर स्वागत वाळवा तालुका अध्यक्ष शिवाजी सकटे यांनी केले.
यावेळी युवक राज्य सरचिटणीस चंद्रकांत लोंढे, कर्नाटक राज्य संघटक स्वप्निल बनसोडे, कर्नाटक राज्य उपाध्यक्ष लखन वायदंडे, बेळगाव जिल्हा अध्यक्षा शोभा माळी,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश घाटगे,राज्य सल्लागार कमिटी सदस्य अंकुश शिंदे मेजर,पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अमर शिंदे, सांगली जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा पूजा बागडे, विठ्ठल नाटेकर, भिम्माण्णा शिंदे,संजय केंगार, सुजाता कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, इंद्रजीत चव्हाण ,शंकर चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सातारा सुकेशिनी साठे, रंजना जाधव, कोमल भोसले, सुहास लांडगे, सांगली जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, नामदेव वारे, कोल्हापूर जिल्हा संघटक दौलत घाटगे वाळवा तालुका अध्यक्षा लिलाताई संपकाळ,कोमल भोसले,रेखा साळुंखे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार राजकुमार पाटसुते यांनी मांनले