स्वेरी एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांची ‘इंडसइंड’ बँके मध्ये निवड

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी लोगो, एमबीए चिन्ह, ‘इंडसइंड बँक’मध्ये निवड झालेले माधुरी जाधव व विक्रम रणदिवे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत असलेल्या एम.बी.ए.मधील माधुरी संजय जाधव व विक्रम विनायक रणदिवे या दोन विद्यार्थ्यांची पंढरपूर मधील ‘इंडसइंड’ या बँकेत कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.
स्वेरीने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए. ची गुणवत्ता आणि महत्व पदवी अभियांत्रिकी प्रमाणेच टिकवून ठेवले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे एम.बी.ए.च्या दोन विद्यार्थ्यांची निवड बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या ‘इंडसइंड’ बँकेच्या पंढरपूर शाखेत करण्यात आली. ‘इंडसइंड’ बँकेचे एच.आर. व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून एम.बी.ए.च्या अंतिम वर्षातील माधुरी संजय जाधव व विक्रम विनायक रणदिवे या दोन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण कोरोना प्रभावित काळातही वाढत आहे. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले करिअर घडवीत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व संबंधित प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून ‘इंडसइंड’बँकेमध्ये निवड झालेल्या माधुरी जाधव व विक्रम रणदिवे यांचे अभिनंदन केले.


