Uncategorized

नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्पास दिली भेट

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर – मंगळवेढा मधील डाॅक्टर यांनी ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.04.05.2021 रोजी टेंभुर्णी येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी – अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या व त्यावर या प्रकल्पाचे चालक मा. प्रभाकर शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सद्या काळात 24 तास प्लॅट चालूनही ऑक्सिजन पुरवठ्याची खूप मोठी टंचाई असल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होत आहे. कमी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. समाधान आवताडे यांनी या भेटीदरम्यान FDI अधिकारी व जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून या प्रकल्पा संबधित माहिती व अडचणीची माहिती दिली. दि.05.05.2021 रोजी सकाळी 11.00 वा बैठकीची वेळ घेतली.

याबैठकी मध्ये पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात निर्माण झालेल्या कोरोना स्थिती अनुषंगाने त्यांनी येथील ऑक्सिजन तुटवडा, रेमडिसिवर इंजेक्शन तसेच वॅक्सशीन या बाबत जिल्हाधिकारी यांचे सोबत मिटिंग घेण्याचे नियोजन केले बाबतची चर्चा होणार असले बाबत आ. आवताडे यांनी सांगीतले…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close