पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महीला आघाडीचा लाँकडाऊन बाबत आक्रमक पवित्रा
कोरोनाचं गांभीर्य आम्हाला आहे.पोटापाण्याचं व कर्ज हप्त्याचं काय...थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिरज-सोमवार कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशावर आणि जगावर आहे याची आम्हा महिलांना पूर्णपणे कल्पना आहे. देशाच्या पंतप्रधानांना निवडणुकांचं आणि राजकारण करण्याचे पडलं आहे .परंतु राज्यामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या अशा परिस्थितीमध्ये कोरोना फैलावला नाही का ? असा खणखणीत सवाल करत थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये सहा महिन्याचे लाँक डाऊन करा आम्हाला त्याची फिकीर नाही. परंतु सर्व सामान्य कुटुंबातल्या महिलांच्या पोटापाण्याचं आणि कर्जाच्या हप्त्याचे कायमचेच लॉक डाउन करणार का ?असा सणसणीत खडा सवाल पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महानगरपालिका क्षेत्राच्या अध्यक्षा ज्योती गोकाक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात विचारला आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मा खंडू कांबळे यांच्याकडे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे व मा.मुख्यमंत्री याना लिहीलेल्या निवेदनाच्या प्रती दिल्या.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेला कोरोना काळ हा मरण यातना पेक्षा कठीण आहे हाताला काम नसल्यामुळे पगार नाही छोटे-मोठे व्यवसाय पूर्ण बंद आहेत राजकारणाचा प्रचार करायला फिरत असताना कोरना चा फैलाव झाला नाही का छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून गरीब जनता जगू शकत होती कडक निर्बंध लावले असते तर व्यवसाय चालले असते. लॉक डाउन कितीही वाढवा परंतु आमच्या पोटापाण्याची सोय करा व कर्जाचे हप्ते पूर्णपणे थांबवा नाहीतर भविष्यात पुरोगामी संघर्ष परिषद महिला आघाडी आक्रमक रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मिरज शहराध्यक्षा मिनाक्षी आवळे,अनिता गोकाक,धनश्री घोरपडे,मिना आवळे,पल्लवी सातपुते,स्मिता खरात,कुसूम माने,रमेजाबी पटेल,लता पुजारी, रूपाली कांबळे,आरती लोंढे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



