राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श राज्यकर्त्यांनी घेण्याची हीच खरी वेळ:अध्यक्षा ज्योती गोकाक

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिरज:- दिनांक ६ मे
राजर्षी शाहू महाराजांनी दुष्काळामध्ये राज्यात राज्यभर दौरा करून जनतेला आधार देण्याचं काम केलं होतं गोरगरीब जनता उपाशी मरू नये म्हणून व्यापाऱ्यांना मोफत धान्य द्या तुमचे पैसे राज्याच्या तिजोरीतून चुकते करू आणि व्यापाऱ्यांना धान्य खरेदीसाठी बिनव्याजी पतपुरवठा करू म्हणून सांगणाऱ्या व जनतेला दुष्काळात आधार देणाऱ्या या महान राजा चे कार्य आदर्शवत होते तोच आदर्श आत्ताच्या राज्यकर्त्यांनी जर घेतला तर कोरोनाच्या काळात जनतेला जगण्यासाठी फार मोठे बळ येईल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली ,मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्र अध्यक्षा सौ. ज्योती गोकाक यांनी केले .त्या समता नगर येथे राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतिदिनी अभिवादन करताना बोलत होत्या.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हा युवक आघाडीचे उपाध्यक्ष मा खंडू कांबळे होते.
प्रास्ताविक व स्वागत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मिरज शहरअध्यक्षा मिनाक्षी आवळे यानी केले यावेळी अनिता गोकाक,पल्लवी सातपुते,अरूणा कुपन्नावर,मनिषा कांबळे,कुसुम माने,महादेवी कांबळे,सोनाली साठे,आश्विनी साठे इ.महीला उपस्थित होत्या.
शेवटी आभार समता नगर शाखा अध्यक्षा सिमा साठे यानी मानले