युुुवा उद्योजक सुभाष सातपुतेंकडून २ लाखाचे आरोग्य साहित्य प्रदान
दानशुर तालुकावाशीयांनी मदतीसाठी पुढे यावे - तहसीलदार यांचे आवाहन .

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी ( प्रतिनिधी )
पुण्याच्या भरारी ग्रुपचे संस्थापक, आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचे सर्वस्पर्शी, सर्वप्रिय ,सर्वमान्य आणि सर्वोत्तम युवा उद्योजक सुभाष सातपुते यांनी आज २ लाख रुपयापेक्षा अधिक किंमतीचे आरोग्य साहित्य प्रदान करून मानवतावादी सेवाभाव पुन्हा दाखवून दिला आहे .
कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांची काळजी वाढविणारी आहे . तहसीलदार सचिन मुळीक यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून में सुभाष सातपुते आणि कंपनी पुणे यांचे प्रमुख सुभाष सातपुते यांनी तातडीने २ लाख २३ हजार रुपये किंमतीचे आरोग्य साहित्य आज आटपाडी तहसील कार्यालयात प्रदान करून मोठी मोलाची भूमिका बजावली .
तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे , ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. इम्रान तांबोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सौ . साधना पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या उपस्थितीत सुभाष सातपुते यांनी तहसीलदारांना आरोग्य साहित्य प्रदान केले . विविध प्रकारच्या औषधी गोळ्या, सॅनिटायझर, पी पी ई किट, हॅन्डवॉश,ऑक्सीमीटर, टेम्प्रेचर गण इत्यादी आरोग्य साहित्याचा यात समावेश आहे .
कोरोणा महामारीच्या पहिल्या लाटेवेळीही सुभाष सातपुते यांनी आटपाडी तालुक्यातील विविध गावासह पुण्यात शेकडो सर्वसामान्यांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट प्रदान केले होते . गतवषी आटपाडी येथील असाह्य,अगतिक, गरीब, उपेक्षित वृद्ध दांम्पत्यांच्या घरावरील वादळी वार्याने पत्रे उडाल्यानंतर त्यांना तात्काळ रोख २५ हजार आणि महिनाभर पुरेल एवढे जीवनाश्यक वस्तूंचे कीट देवून सुभाष सातपुते यांनी चक्क त्या दांम्पत्याच्या लेकाची भुमिका बजावली होती . शेकडो तरुणांची पुण्या मुंबईत माय – सच्चा साथी बनणाऱ्या सुभाष साातपुुुते यांनी नेहमीच अनेक तरुणांना मदतीचा हात दिला आहे . पनवेल तहसील कार्यालयात गत उन्हाळ्यात लाख रुपये किंमतीचा भेट दिलेला वॉटर कुलर सुभाष सातपुते यांच्या दातृत्वाची प्रचिती दाखवून गेला . बिघडलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी “पाणी तुमचे झाडे आमची” हे अभियान हजारो झाडे वाढीस लावणारे, सर्वांना भावणारे ठरले . विविध उपक्रमातून समाजासाठी सदैव कार्यरत राहणारे सुभाष सातपुते यांच्या जिंदादिलीला सर्वांनी नेहमीच सलाम केला आहे .
सुभाष सातपुते यांच्या दातृत्वाला सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले . कोरोनाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि शेकडो सामान्य रुग्णांना मदत व्हावी म्हणून आटपाडी तालुक्यातील दानशुर व्यक्ती ,सेवाभावी संस्था, संघटना, ट्रस्ट इत्यादींनी वस्तु रुपाने आरोग्याचे साहित्य शासनाला दान देवून तालुक्यावरील या अरिष्टात मानवतावादी भूमिकेने पुढे यावे . असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक यांनी करून आटपाडीच्या स्वतंत्रपुरातल्या कथानकावर साकारलेल्या जगविख्यात” दो आँखे बारह हाथ” या चित्रपटातील क्रुर गुन्हेगारांना प्रेमाने , सदवर्तनाने माणसात आणण्याचा प्रयोग यशस्वी राबविणारा हा मानवतावादी लोकांचा आटपाडी तालुका असल्याने या कोरणा महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी शेकडो तालुका वाशीय पुढे येतील असा आशावाद ही तहसीलदार सचिन मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला .
यावेळी सुधीर विभुते, प्रविण कुचेकर,सचिन आटपाडकर, नजीर शेख हे उपस्थित होते.