Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषद महिलांना घरबसल्या हाताला काम देणार-राज्य कार्याध्यक्षा अनामिका गडकरी

मुंबई (साकीनाका) येथील कार्यालयात पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करताना प्रदेश कार्याध्यक्षा सौ. अनामिका गडकरी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजेंद्र भिसे व इतर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

मुंबई:-[ साकीनाका अंधेरी पूर्व] पुरोगामी
परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा.सुभाष वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली राज्यातील कोणतीही जात कोणताही धर्म न बघता सर्वच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी घरबसल्या शासनाच्या विविध योजनातून छोट्या छोट्या उद्योगाच्या माध्यमातून हाताला काम देऊन आर्थिक बळ देण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद राज्यभर वेगवेगळ्या योजना राबवणेसाठी महिलांना मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार असल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनामिका गडकरी यांनी केले त्या मुंबई येथील साकीनाका अंधेरी पूर्व येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यालयामध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रमुख उपस्थितीत राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र भिसे होते.
स्वागत व प्रास्ताविक मुंबई प्रदेश अध्यक्ष सौ जयश्री सावंत यांनी केले.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या देगाव तालुकाध्यक्षपदी सौ भाग्यश्री महापुरे (खवळे) यांची नियुक्ती करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सौ. गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुंबई प्रदेशचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close