Uncategorized
सकल जैन समाज पंढरपूर तालुका,शहर यांच्यावतीने निषेध मोर्चा
सम्मेद शिखरजी या जैन तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केल्याचा निषेध

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – सकल जैन समाज पंढरपूर तालुका,शहर यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. सम्मेद शिखरजी हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी संपूर्ण भारतात बंदचे आयोजन करण्यात होते. त्यानिमित्त पंढरपूर येथे जैन समाजाने बंद पाळुन निषेध मोर्चा काढला होता.
झारखंड सरकारने सम्मेद शिखरजी या जैन तिर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर सकल जैन समाजाने आज दि.२१ डिसेंबर रोजी ९.०० वाजता फडे दिगंबर जैन मंदिर येथून निषेध मोर्चा चे आयोजन केले होते.

पंढरपूर तहसील कार्यालयात डेप्युटी कलेक्टर समाधान भटुकडे यांना पंढरपूर शहर व तालुक्यातील सकल जैन समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महाद्वार , पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महावीर नगर,श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर वीरसागरनगर,त्रिलोक तीर्थक्षेत्र शेगांव दुमाला चे पदाधिकारी,पद्मावती महिला मंडळ, सुमन श्री महिला मंडळ, क्रांती महिला मंडळ, सिध्दश्री महिला मंडळ, युनिकक्रांती महिला मंडळ, स्वयंसिध्दा महिला मंडळ, स्वानभुती महिला मंडळ, शुभश्री महिला मंडळ,जैन सोशल ग्रुप,सन्मती सेवा दल, महावीर युवा सेना,जैन चॅरिटेबल ट्रस्ट,जैन युवा फेडरेशन,जैनवाडी, देगाव,पेनूर, पाटकूल, करकंब,कौठाळी,सरकोली येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.