पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शंकर कांबळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
बार्शी:-(ऊपळाई ठोंगे)- पुरोगामी संघर्ष परिषदेची बार्शी तालुका कार्यकारणीची बैठक बार्शी येथे पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये उपळाई ठोंगे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर आजिनाथ कांबळे यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र अविनाश कांबळे यांनाी देऊन सत्कार करून पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर सत्कारास उत्तर देताना शंकर कांबळे म्हणाले, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी पुरोगामी विचारावर सामाजिक परिवर्तनाची जी लढाई चालू केली आहे ती
तळागाळात नेऊन सामाजिक परिवर्तनाचे प्रामाणिकपणे काम करून समाजाला न्याय देण्याचं काम करेन.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले सदर बैठकीस गणेश कांबळे, बाळाजी कांबळे, अविनाश कांबळे, दादासाहेब कांबळे, केशव कांबळे ,संतोष कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.