महापुरुषांचा अवमान महामानवाच्या विचाराचे हनन करण्यासाठी रचलेले षडयंत्र–पांडुरंग रणदिवे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्वीच्या जमानाचे आदर्श आहेत. खरंतर एक जबाबदार व्यक्ती असे बोलत असेल तरीही अत्यंत दुर्देवाची गोष्ट म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदर्श आहेत. या देशांमध्ये गेल्या दोन हजार वर्षांमध्ये अनेक राजघराण्यांनी राज्य केले. त्याच्यातील एकाही राज्यकर्त्यांनी देशातील बहुजन समाज व अठरापगड जातीतील लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतले नाही. शिवाजी महाराजांनी परंपरेने चालत आलेली मनुवादी व्यवस्था नाकारून या बहुजन समाजाला निर्णय प्रक्रियेमध्ये घेतले .जात धर्म न बघता व्यक्तीचे अंगचे गुण बघून त्यांना कामे वाटून दिली. स्वराज्यातील रयतेच्या रक्षणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात आयुष्यभर संघर्ष त्यांनी केला. एखाद्या मोहिमेवर आपले सैनिक जात असताना शिवाजी महाराज सैनिकांना आज्ञा करत की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे केले तर त्याची गाय केली जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे बहुजनाचे भूतकाळात आदर्श होते वर्तमान काळात आदर्श आहेत व भविष्यकाळात ही आदर्श असतील अशी भुमिका पांडुरंग रणदिवे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य प्रवक्ते यांनी जोशाबा टाईम्सशी बोलताना व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, परंतू इथल्या मनुवादी विचारांच्या नालायक राज्यकर्त्यांना शिवाजी महाराज, फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या विचाराचे कार्याचे हरण करायचे आहे. या मनुवाद्यांना शिवाजी महाराज पूर्वीचे आदर्श वाटतात तर मग हे राम आणि कृष्ण समाजाची आत्ताचे आदर्श आहेत कसे तेही शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे आहेत . भेद्याच्यासांगण्यावरून स्वतःच्या पत्नीला अरण्य वनात सोडणाऱ्या रामाचा आदर्श काय घ्यायचा सोळा हजार एकशे आठ बायका करणाऱ्या कृष्णाचा आदर्श काय घ्यायचा याचा विचार बहुजन समाजाने केला पाहिजे .भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा काढल्या खरंतर ज्या वेळेला बहुजन समाज मनुवाद्यांच्या मानसिक गुलामगिरी मध्ये भरडत होता त्यांच्या विकासाची सारे द्वारे बंद होती. हजारो वर्षी या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले. शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे या समाजाचा विकास कुठला आहे .हे महात्मा फुले यांनी जाणले ते म्हणतात,” विद्येविना मती गेली, मती विना गती गेली ,गतीविना वित्त गेले ,वित्त विना शूद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून महात्मा फुले यांनी बहुजन समाजासाठी शाळा सुरू केल्या. स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे शिक्षण घेता यावे यांच्यासाठी मुलींची पहिली शाळा 1848 साली सुरू केली ..त्यानंतर त्यांनी बुधवार पेठ, रस्ता पेठ ,व वेताळ पेठ या भागात आणखी तीन शाळा सुरू केल्या. या शाळेत अध्यापनासाठी एका शिक्षिकेची गरज होती म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्री बाईला शिक्षण दिले .व अध्यापिका केले .महात्मा फुले यांना अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटला महार, मांग लोकास शिकवल्याशिवाय या देशाचे हित होणार नाही असे त्यांना वाटते म्हणून त्यांनी1852 साली अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. मुळात चंद्रकांत पाटलांना माहीत असायला पाहिजे होते की ज्यावेळी महात्मा फुले यांनी या शाळा सुरू केल्या त्यावेळी त्यांच्या विरोधात इथला संपूर्ण श्रीमंत असलेला मनुवादी समाज होता .त्यामुळे यांच्याकडून मदत मिळणे अत्यंत कठीण होते .आणि ज्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या तो बहुजन समाज भुके कंगाल होता .अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ही पैसे मिळवणे मुश्किलच होते. दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यावेळी टाटाचे उत्पन्न वार्षिक वीस हजार होते .तेव्हा महात्मा फुले यांचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपये होते. टाटा पेक्षा श्रीमंत महात्मा फुले होते .त्यांनी आपल्या काही सहकार्याकडून मदत घेऊन व स्वतःच्या पैशातून या शाळा काढल्या. म्हणून त्यांनी भीक मागून शाळा काढले हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. हजारो वर्ष जो समाज माणुसकी पासून वंचित होता. 18 विश्व दारिद्र्यात कितपत पडला होता. त्याची सावली सुद्धा विटाळ मानली जात होती. अशा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद येथील मिलिंद आणि मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालय त्यांनी स्थापन केली.
आपल्या अज्ञानी समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात. माता-पिता फक्त जन्म देतात कर्म देऊ शकत नाहीत. ही भावना आपण टाकून दिली पाहिजे. आपल्या मुला बाळांच्या इच्छित ध्येयास आपण आकार देऊ शकतो. या तत्त्वाचा आपण अवलंब केला तर लवकरच आपल्याला चांगले दिवस प्राप्त होतील. म्हणून आपण मुलाबरोबरच मुलींनाही शिक्षण द्यावे तुम्ही शिक्षणाचे प्रचार कार्य करावे .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या पैशातून या संस्था उभारले आहे लक्षात असू द्या त्यांनी भीक मागितले हे म्हणणे नालायकपणाचे लक्षण म्हणावे लागेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. दिनदलित बहुजन समाजातील मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. शेतकरी म्हणजे रयत रयतेला शिक्षण देण्यासाठी संस्था काढली .भाऊराव अण्णांनी या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याकडून फुल व फुलाची पाकळी म्हणून मदत घेऊन ही संस्था चालवली .गावागावातून घराघरातून त्यांनी मुष्टी फंड योजना सुरू केली जात्यावर एक पिशवी टांगली असे धान्य दळायला बाई बसली की त्या पिशवीत मुठभर धान्य टाकावयाचे आठवड्याचे शेवटी वस्तीगृहातील विद्यार्थी त्या पिशवीतील धान्य एकत्र जमा करत. सुगीच्या दिवसात वस्तीगृहातील विद्यार्थी व शिक्षक खळ्यावर जाऊन धान्य गोळा करीत .तसेच जमिनीचा सारा वसूल करताना शाळे करता देणगी गोळा केली जाई. लग्न सोहळा असेल तेथेही शाळेसाठी पावती पडली जाई. व अशा प्रकारे लोकसभागातून संस्थेचा खर्च भागविला जाई म्हणून आज बहुजनाची पोर डॉक्टर, इंजिनीयर, वकील, कलेक्टर अशा महत्त्वाच्या जागेवर आहेत. हे रयत शिक्षण संस्थेचे योगदान सर्वात मोठे आहे .या लोकसहभागातून चालवलेल्या संस्थेला भीक मागून चालवले म्हणणे मनुवाद्यांचा खोडसाळ प्रचार आहे .बहुजनाचे मेंदू गुलाम करण्यासाठी जे मंदिर बांधले जाते व मनोवाद्याकडून ज्या शिक्षण संस्था चालू केल्या जातात. त्यांच्यासाठी मागितलेली देणगी .आणि फुले शाहू आंबेडकरांनी मागितलेली भीक कशी असू शकते .हे बहुजन समाजातील महामानवाच्या विचाराचे हनन करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. हे लक्षात असू द्या. असा इशारा पांडुरंग रणदिवे यांनी दिला.


