स्व. आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे वतीने 4 मे रोजी “स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-स्व. आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पंढरपूर यांचे वतीने स्व. आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा व पंडीतराव तुकाराम देशमुख यांची माढा तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा हृद्य सत्कार समारंभ प्रशांतराव परिचारक चेअरमन, कर्मयोगी सु.रा. परिचारक पांडुरंग सह. सा. का. श्रीपूर यांचे हस्ते जोगेश्वरी मिसळ सभागृह, मार्केट यार्ड समोर, पंढरपूर सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वामनराव माने मा. सभापती, पंचायत समिती, हे असून यावेळी प्रमुख पाहुणे अमरसिंह देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली, हरिषदादा गायकवाड सभापती, कृ.उ. बाजार समिती, पंढरपूर हे असणार असून सुभाषराव माने मा. सदस्य, जि. प. सोलापूर माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे पुत्र, काटी धाराशिव या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
स्व. आप्पासाहेब चव्हाण सर स्मृती पुरस्काराचे मानकरी
साहित्य . शिवाजीराव बागल ग्रामीण साहित्यिक, पंढरपूर शैक्षणिक विष्णूपंत गावडे जि. प. प्रा. शाळा, तावशी
सामाजिक सौ. शांता क्षीरसागर सोलापूर
गुणवंत विद्यार्थी मानकरी चि. समर्थ दत्तात्रय रोंगे (जि.प. प्राथ. शाळा, बोहाळी) चि. संघर्ष लखन छापछडी (महिला मंडळ विद्यालय, पंढरपूर) कु. स्वरा महादेव शिंदे (जि.प. प्राथ. शाळा, रांझणी) कु. वैष्णवी गणेश सुतार (विद्या विकास मं.चे प्राथमिक विद्यालय पंढरपूर) कु. श्रेया सचिन गवळी (द.ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर) कु. यशस्वी धनंजय नांदरे (लोकमान्य विद्यालय, पंढरपूर) कु. उपासना सचिन कुंभार (गोपाळकृष्ण विद्यामंदिर, गोपाळपूर) कु. श्रुती सज्जन पुरी (भैरवनाथ विद्यालय, आढीव)
तरी वरील कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन स्वागतोत्सूक : अमरसिंह चव्हाण, अमोल चव्हाण, श्री. प्रतापसिंह चव्हाण स्व. आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पंढरपूर यांनी केले आहे.


