Uncategorized

प्रथमेश पाटीलची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील बॉक्सिंग खेळाडू प्रथमेश पाटील याची नोएडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या हस्ते प्रथमेशचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रथमेशने मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात मानाची भर पडली आहे. आगामी स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा. मनोज खापले, प्रा. विठ्ठल फुले, सेवक ओंकार नेहतराव तसेच महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य व विभागप्रमुख उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी प्रथमेशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close