पंढरपूर पोलिसांनी जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरा कडून अंदाजे ०६ लाख ०५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये . प्रशांत डगळे, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर व दशरथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र. नं. १३१/२०२६ बी.एन.एस ३०४ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी व तिची आई या दोघी इसबावी येथील विसावा मंदिर येथे दर्शन करून रात्री ०७/३० वा.चे सुमारास घराकडे जात असताना झिप बाय स्प्री हॉटेलजवळ नवशक्ती चौकात आले असता अचानक पाठीमागुन एक काळया रंगाच्या मोटार सायकलवर आलेल्या व हेल्मेट घातलेल्या इसमाने फिर्यादीचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिस्कावुन चोरून नेले होते. त्या गुन्हयाचा तपास चालू असताना दिनांक २९/०३/२०२६ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा पंढरपूर येथील सरगम चौक येथे एक काळया रंगाचे मोटार सायकलवर हेल्मेट घालुन थांबला आहे अशी माहिती मिळाल्याने बातमीच्या नमुद ठिकाणी जावुन त्याचेकडे विचारपुस करीत असताना तो त्याचेकडील मोटार सायकलवरून पळून जावु लागला त्याचा संशय आल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांनी पाठलाग करून पकडले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करून अधिक तपास करता आरोपी आण्णा दशरथ लाडे वय. ३४ वर्षे, रा. सुपली ता. पंढरपूर जि. सोलापूर याचेकडुन गुन्हयातील गेला माल १,०३,९६४/- रू.किं. चे १७ ग्रॅम २० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र (मिनीगंठण) जु.वा.कि.अं. हे जप्त करण्यात आले आहे व आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली एक काळया रंगाच्या युनिकॉर्न मोटार सायकल नं. MH-13-EU-9595 ही मोटार सायकल त्यांचेकडे मिळाल्याने तो गुन्हयाचे तपासात जप्त केली असून त्याला अटक केल्यानंतर त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आणखीन ३ गुन्हे केले असल्याची कबुली देवून त्याने गुन्हयातील जबरदस्ती चोरून नेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेला आहेत.१) गु.र.नं. १३१/२०२६ बीएनएस ३०४ (२) प्रमाणे२) गु.र.नं. १६६/२०२६ बीएनएस ३०४ (२) प्रमाणे३) गु.र.नं. १६८/२०२६ बीएनएस ३०४ (२) प्रमाणे४) गु.र.नं. ७७३/२०२५ बीएनएस ३०३ (२) प्रमाणे
सदरची कामगीरी ही अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग . प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, सपोफौ/शरद कदम, पोह/३९८ सिरमा गोडसे, पोह/१७८९ सचिन हेंबाडे, पोह/१३०७ सोमनाथ पाटील, पोहेका / ८०५ गणेश पवार, पोना/५६३ साहिल तांबोळी, पोना/५४६ कृष्णा पकाले, पोकॉ/१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१३०४ दिपक नवले, पोकॉ/१५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ/१२४० हर्षद ठाकर, चपोका/५०३ बडे व सायबर शाखेकडील पोकों/रतन जाधव यांनी केली आहे.




