Uncategorized

पंढरपुर शहरात जनगणनेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात -मुख्याधिकारी महेश रोकडे

जनगणनेसाठी 25 पर्यवेक्षक व 150 प्रगणकांची नियुक्ती

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि,17):- पंढरपूर शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना डिजिटल जनगणना करण्यासाठी 01 ते 15 मे दरम्यान मुदत दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या भागाला शनिवार (ता.16) पासून सुरवात झाली आहे. यात प्रगणक प्रत्येक घरी जाऊन घरयादी व घरगणनेचे काम करणार आहेत. स्वगणना केली नसल्यास तरी देखील घरगणनेचे काम प्रगणक करतील. यासाठी नागरीकांनी आलेल्या प्रगणकांना अचूक माहिती द्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.


दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीतील दुसऱ्या टप्प्याच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झालेली असून, जनगणना संचालनालय सह संचालक रमेश भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देवुन बोहरी पेट्रोल पंप येथील भागातील सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली व त्या भागाचे प्रगणक, पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील जनगणना अधिकारी,उपस्थित होते. पंढरपूर शहरात जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करण्याकरिता 25 पर्यवेक्षक व 150 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.जनगणनेसाठी नागरीकांनी प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
०००००००००

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close