विवेक वर्धिनी प्रशालेत संविधान दिन साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी संविधानाचे महत्त्व, उद्देश याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी प्रशालेतील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनिनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले .यावेळी भारतीय संविधानावर विद्यार्थिनींनी भाषणे केली तसेच संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले या दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी
पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, विभाग प्रमुख संजय पवार,मुख्य लिपिक हनुमंत मोरे,अधीक्षक अमोल हुंगे,सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे,राजूभाई मुलाणी,संजय क्षीरसागर,सुनील विश्वासे,सतीश भंडारे,विलास सातपुते,बबन कोकतरे त्याचबरोबर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



