Uncategorized

लोकशाहीचे स्तंभ राजसत्तेचे गुलाम बनून संविधानाशी धोकेबाजी करतात— ॲङ डॉ. सुरेश माने.

फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच आटपाडी व्याख्यानमाला पुष्प ६ वे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

डाँ.रामदास नाईकनवरे सांगली जिल्हा प्रतिनिधी

आटपाडी– दि. 25/11/2022
भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये लोकशाही रूजावी व सामन्य जनता प्रबुध्द बनावी या हेतुस्तव निर्माण केलेल्या न्याय पालिका, कार्यकारी पालिका , शासन आणि मिडीया या चारही स्तंभानी भारतीय संविधानाचा सतत विश्वासघातचं केला आहे. लोकशाहीची मूल्ये समाज जिवनात घडावी व प्रत्येक नागरीक सजगपणे , सक्षम मनाने या करिता या चारही स्तभांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पाडली नाही. उलट राजकीय सत्तेचे गुलाम बनून आपले पावित्र्य त्यांनी धोक्यात आणले आहे. स्वता न्यायालय न्यायदानाच्या प्रक्रियेत सामान्‍य माणासाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकले नाही.


जनतेच्या हिताचे कायदे संसदेमध्ये निर्माण केले जात नाही. उलट सामान्य माणसाच्या मनामध्ये संविधानाबद्दल संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक केली जात आहे. शासन प्रशासनामध्ये सामान्य माणसाची दखल घेतली जात नसून त्याच्या न्याय , हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. आणि मिडीयाच्या माध्यामातून प्रस्थापित सत्ताधा-यांच्या मनमानी , विषमतावादी विचाराने बळकटी दिली जावून हिंदुत्वावादी राज सत्तांना आश्रय दिला जातो. आणि त्यांचया धर्मांध व शोषक धोरणांचा भडिमारा सामान्य माणसावर सातत्याने केला जातो . त्यामुळे लोकशाहीचे चार स्तंभ असणा-या या घटकांना स्वताचे पावित्र्य ठेवलेले नसून ते प्रस्थापित राजसत्तेच गुलाम बनून भारतीय संविधानाशी नेहमीच धोकेबाजी करीत आहे. असे प्रखर मत मुंबई हाय कोर्टाचे वकील व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ अभ्यासक व विचारवंत , कायदेतज्ञ ॲङ डॉ. सुरेश माने यांनी मांडले.
फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “ वर्तमान लोकशाहीचे चार स्तंभ आणि भारतीय संविधान: एक गंभीर चर्चा ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई आ. चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे हे होते. फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेची दखल निश्चितच महाराष्ट्र पातळीवर घेतली जाईल. या व्याख्यानमालेसाठी काही अडचणी निर्माण झाल्यास तेव्हा आम्ही राजेंद्र खरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. असे ठोस आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतामध्ये दिले.
या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षीय भाषणामध्ये फुले , शाहु, आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी या संविधान सप्ताहसाठी सर्वांनी सहकार्य करावे. हा सप्ताह यापुढे अखंडपणे चालु ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी वाघमोडे यांनी केले. सुत्रसंचालन ग्रामीण कथाकार जीवन सावंत , तर आभार प्रतिभा सावंत यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई हायकोर्टाचे वकील ॲङ राहुल जडे यांच्यासह लक्ष्मण मोटे , प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , धनंजय वाघमारे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , नामदेव खरात , भिमराव कदम, अक्षय बनसोडे , किरणकुमार जावीर , समाधान ऐवळेसर, विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे ,भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर , जयश्री नामदेव खरात, जानता दुर्योधन खरात, प्रियांका विवेकानंद खर्चे इ. असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close