Uncategorized

भारतीय संविधान हे देशाची आचारसंहिता असून संसदीय प्रणालीने त्याचे योग्य संचलन करावे… –सुनिल वाघमारे

फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच आटपाडी व्याख्यानमाला पुष्प ५ वे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

डाँ.रामदास नाईकनवरे सांगली जिल्हा प्रतिनीधी

आटपाडी – दि. 24/11/2022 आपल्या देशाचा इतिहास हा क्रांती व प्रतिक्रांतीचा असून महापुरूषांच्या अथक परिश्रमातून लोकशाही मूलक राज्यघटना आपल्या देशाला मिळाली. ही राज्यघटना अथवा संविधान हे या देशाची आचारसंहिता असून संसदीय राज्यकर्त्यांकडून त्याचे योग्य संचलन झाले नाही तर हा देश पुन्हा एकदा धर्ममूलक विषमताधिष्ठीत बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या देशातील सर्व बुध्दीवादयांनी समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समर्पित व प्रशिक्षीत कार्यकर्त्यांचा संच सोबत घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे. असे अवाहन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अभ्यासक व विचारवंत, प्रबुध्द परिवाराचे नेते, पंढरपूरचे सुनिल वाघमारे यांनी पाचवे पुष्प गुंफताना केले.
ते फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “ भारतीय संविधानाची मूल्य व्यवस्था आणि वर्तमान संसदीय प्रणाली ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते आपल्या मार्गदर्शक भाषणात पुढे म्हणाले की, आज वर्तमान स्थितीमध्ये भारतीय समाज जिवन संसदीय नेतृत्वांकडून अत्यंत गढूळ बनविले जात आहे. समाज जिवनामध्ये प्रबोधन करणा-या जेष्ठ अभ्यासकांच्या व विचारवंताच्या जाणीवपूर्व हत्या घडवून आणल्या जात आहेत. प्रबोधनाची भूमिका घेणा-या कार्यकर्त्यांना देशद्रोहाच्या गुन्हयाखाली जाणीवपूर्वक खोटया केसेस दाखल करून अडकविले जात आहे. हा देश सातत्याने अस्थिर कसा होईल या उद्देशाने जातीच्या , धर्माच्या नावाने देशामध्ये संभ्रम निर्माण करून जनतेची भावनिक पातळीवर दिशाभूल केली जात आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या व समाजहिताच्या विकासाचे प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाणीव पूर्वक घालवले जात आहेत. आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षण , मराठा आरक्षणाबाबत, संभ्रम निर्माण करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.
या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला धर्म स्वातत्र्य दिले असून हिंदु मुस्लिम , हलाल, भोंगा , व हनुमान चालिसा यांचे सार्वजनिकरीत्या प्राबल्य वाढवून धर्मांध शक्तीला जाणीवपूर्वक बळ दिले जात आहे. म्हणून यासर्व गोष्टींना आळा बसविण्यासाठी या देशातील समस्त बुध्दीवादी आंबेडकरवादयांनी देशातील बहुजनांना क्रांतीचा इतिहास सांगण्यासाठी आपले तन, मन, व धन संमर्पित करून समोर यावे. कारण, सध्याच्या वर्तमान स्थितीत विषमतावादाचे विष समाज जीवनात पेरून लोकशाही मूल्य व्यवस्था नष्ट करून येणा-या नजीकच्या काळामध्ये हुकूमशाही प्रणाली आणू पाहणा-या ब्राम्हणवादी संसदीय प्रणालीला समस्त आंबेडकरवाद्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडावा. असेही त्यांनी आवाहन केले.
सदर कार्यकामाचे अध्यक्ष सांगली जिल्हा शिक्षकबँकेचे संचालक शदर चव्हाण सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपल्यामधील जातीव्यवस्था नष्ठ होऊन संविधानाच्या माध्यमातून समताधिष्ठीत समाज आपण निर्माण करावा. असे म्हटले. तसेच या मंचच्या वतीने हा संविधान सप्ताह अखंडपणे चालु रहावा यासाठी सांगली जिल्हा शिक्षक संघ सतत आपल्याला सहकार्य करेल असेही त्यांनी आश्वासन दिले.
याकार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षीय भाषणा मध्ये फुले , शाहु, आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी या संविधान सप्ताहसाठी सर्वांनी सहकार्य करावे. हा सप्ताह यापुढे अखंडपणे चालु ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाई आ. चे तालुका सरचिटणीस रणजीत ऐवळे यांनी केले व आभार निता सावंत यांनी मानले. तर सुत्रसंचालन आटपाडी शिक्षक संघाचे अध्यक्ष असिफ मुजावर सर यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी श्रीकांत कसबे संपादक सा.जोशाबा टाईम्स पंढरपुर, डीपीआयचे जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे (माजी नगरसेवक पंढरपुर) प्रा.शिवाजीराव वाघमारे पंढरपुर. प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , नामदेव खरात , भिमराव कदम, अक्षय बनसोडे , किरणकुमार जावीर , समाधान ऐवळे सर, सुनिल ऐवळे , विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे , भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर , जयश्री नामदेव खरात, जानता दुर्योधन खरात, प्रियांका विवेकानंद खरचे यांच्यासह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close