संविधाननिष्ठ भारतासाठी महिलांनी त्यांची मानसिक गुलामगिरी झुगारून दयावी….— प्रा.विक्रांत पाटील
फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच आटपाडी व्याख्यानमाला पुष्प ४ थे


जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
डाँ रामदास नाईकनवरे सांगली जिल्हा प्रतिनिधी
आटपाडी – 23/11/2022
भारतीय संविधानाने महिलांसाठी मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वानुसार लेखन, भाषण , सामाजिक , आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य देऊन त्यांना सन्मानाच्या अति उच्चं शिखरावर पोहोचविलेले आहे. जात , धर्म व लिंग यावरूनही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता संविधानाने भारतातील सर्व महिलांना समान दर्जा व स्वातंत्र्याची हमी दिली आहे. परंतु, हजारो वर्षाच्या पारंपारिक मानसिक गुलामगिरीमध्ये सध्याची महिला आजही वावरत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी व भारतीय संविधानाने त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देऊनही ती व्यवस्थेच्या विरोधात बंड करून आपले स्वातंत्र्य घेण्यास धजवत नाही. त्यामुळे भारतीय महिलेने परांपरावादी मानसिक गुलामीची शाल झुगारून देवून संविधाननिष्ठ भारतासाठी क्रातीच्या दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. असे विचार अभ्यासक प्रा.विक्रांत पाटील यांनी मांडले. ते फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “ भारतीय संविधान व भारतीय महिला ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापुरच्या के.एम.सी कॉलेजचे प्रा. डॉ.युवराज मोटेसर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी भारतीय संविधानाने विविध कलमांच्या माध्यमातुन भारतीय स्त्रियांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या सर्वांचा आढावा घेवून समाजातील स्त्रियांनीही पारंपारिक संस्कृती व विचारातुन बाहेर पडावे. असे अवाहन आपल्या मनोगतातून केले.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना फुले, शाहु आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष व रिपाई (आ) चे जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी फुले, शाहु आंबेडकर विचारमंचाच्या या संविधानिक सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त विचारमंचावर येणा-या अभ्यासकांनी आपल्या विषयाचा पुर्ण अभ्यास करूनच विषयाची मांडणी करावी. आणि ही मांडणी संविधान वाचल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे वाचन हा अभ्यासकांचा श्वास असावा. कारण वाचनाशिवाय काहीच होत नाही. असे मत त्यांनी आपल्या स्वागत अध्यक्षीय भाषाणातुन व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन मोटे यांनी केले. सूत्रसंचालन किरण सोहनीसर यांनी केले. तर आभार अनिषा जावीर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण मोटे, प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , मा.विशाल पाटील , महेंद्र अवघडे , तानाजी सावंत , धनंजय वाघमारे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , नामदेव खरात , भिमराव कदम, अक्षय बनसोडे , किरणकुमार जावीर , समाधान ऐवळेसर, सुनिल ऐवळे , विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे , भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर , जयश्री नामदेव खरात, जानता दुर्योधन खरात, प्रियांका विवेकानंद खरचे यांच्यासह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.


