मॉरिशियस येथे “कोरोनात उगवलेल्या कथा” या कथासंग्रहाचे प्रकाशन….
डॉ. रामदास नाईकनवरे यांच्या ' बे एक्कं बे ' या कथेचा समावेश...

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-दि. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ रोजी मॉरेशिस येथे झालेल्या जागतिक विचार महोत्सव मॉरिशस, आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच भोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनामध्ये प्राचार्य, डॉ. प्रकाश कुंभार यांनी संपादित केलेल्या “कोरोनात उगवलेल्या कथा” या कथासंग्रहाचे मॉरेशिसचे राष्ट्राध्यक्ष मा. पृथ्वीराजसिंह रूपम आणि पंतप्रधान मा. प्रविंद जगन्नाथ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी भारताचे सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले, या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, आणि ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रामदास नाईकनवरे
“कोरोनात उगवलेल्या कथा” या संपादित कथासंग्रहामध्ये कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. रामदास नाईकनवरे (मूळगाव- वाडीकुरोली. ता.पंढरपूर) यांच्या बे एक्कं बे या कथेचा सामावेश आहे. डॉ. रामदास नाईकनवरे यांचे सन २००६ मध्ये “समाज परिवर्तनामधील बुद्धिजीवी वर्गाची भूमिका” हे वैचारिक पुस्तक प्रकाशित झाले आहे. “परिवर्तन” ही दीर्घ कथाही त्यांची अनेक नियतकालिकां मधून प्रकाशित झालेली आहे. ‘मराठी कविता’, ‘मराठी गझल’, ‘ मराठी कादंबरी व ग्रामीण जीवन ‘ याबरोबरच ‘आंबेडकरी तत्त्वज्ञान व सामाजिक चळवळ’ इत्यादी विषयावर त्यांचे मूलभूत असे संशोधन आहे. अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले आहे.
डॉ. नाईकनवरे यांच्या बे एक्कं बे या कथेचा समावेश असणाऱ्या संपादीत कथासंग्रहाचे प्रकाशन मॉरेशिस सारख्या देशांमध्ये होऊन त्याच देशाच्या राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांच्या हस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन होणे ही बाब अत्यंत प्रेरक व कौतुकास्पद असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


