Uncategorized

पाखरे कुटुंबास वैभव गिते यांची सांत्वनपर भेट

जोशाबा टाईम्स वेब पोर्टल

श्रीकांत कसबे

करकंब/प्रतिनिधी- पंढरपूर तालुक्यातील बादलकोट(सांगवी) येथील चर्मकार समाजातील ‘विकास संभाजी पाखरे’ युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून करून त्याचे प्रेत कुरवली या गावाच्या मध्य   भागातुन   ्वाहणाऱ्या नीरा नदी पात्रात टाकून दिल्याची बातमी कळताच नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (N DMJ)सामाजिक संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते, आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक यांनी कार्यकर्त्यांसह अत्याचार पीडिताच्या घरी मात्यापित्याची भेट घेऊन सांत्वन करून विकास पाखरे याच्या खुन्यांना कठोर शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार  नाही असे कुटुंबास आश्वासन दिले.

आणि पोलिस प्रशासनास प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले की विकासच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला.पोलिस प्रशासनानेही प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत
वालचंदनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ४८ तासाच्या आतमध्ये अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा छडा लावला.तपासामध्ये पोलिसांना समजून आले की विकास पाखरे याचे गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक असल्याचा संशय धरून आरोपी नवनाथ नवले,सचिन श्रीधर नवले,महेंद्र आटोळे,दादा हजारे,साधना नवले यांनी विकास याचा खून करून त्याच्या हात-पायाला दोरीच्या साहाय्याने सिमेंटच्या खांबाला बांधून मृतदेह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील सीमेवरील कुरवली गावाजवळील नीरा नदीच्या पुलावरून नदीमध्ये फेकून दिल्याचे निदर्शनास आल्याने एका महिलेसह ५ आरोपींना अटक करत आरोपी विरुद्ध एट्रोसिटी अंतर्गत खुनाची कलमे लावून आरोपींना जेरबंद केले.या कामी मोलाचे कार्य करून पीडिताच्या वारसाला दिलेल्या आश्वासनपूर्ती केल्याबद्दल पीडिताचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी वैभव गिते,विकास धाईंजे, यांचे धन्यवाद मानले.यावेळी एन डी एम जे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाबासाहेब सोनवणे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आजिनाथ राऊत सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक पंढरपूर तालुका युवा नेते रोहित एकमल्ली आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष श्याम काळे माढा तालुका नेते प्रशांत नाईक नवरे माळशिरस तालुका भगवान भोसले माढा तालुका अध्यक्ष रोहित रावडे पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष वासुदेव साठे माळशिरस तालुका नेते जितू साळवे अविनाश ताकतोडे अनिल नवगिरे संजय नवगिरे चर्मकार समाजाचे नेते रतिलाल बनसोडे मोहोळ मंगळवेढा अकलूज लातूर फलटण या विभागातून अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close