Uncategorized

वारी कालावधीत कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक कर्नल विश्वास सुपनेकर यांच्या सूचना

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

पंढरपूर दि.07:-  आषाढी यात्रा कालावधीत श्री विठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात  भाविक येत असतात. काही जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच कोरोना चाचणी केंद्राची स्थापना करावी तसेच संशयितास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करावी, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक (यशदा) कर्नल विश्वास सुपनेकर  यांनी सांगितले.

आषाढी यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कराव्या लागणाऱ्या कामांची पूर्व तयारीचे प्रशिक्षणाबाबत  नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव,  उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 यावेळी बोलताना श्री. सुपनेकर म्हणाले, वारी कालावधीत गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात त्याठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी शिघ्र कृती दलाची नियुक्ती करावी.  प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र,घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मदीर परिसर, तसेच 65 एकर या ठिकाणी वेगवेगळे संभावित धोके  लक्षात घेता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवावी.  यात्रा कालावधीत शहरातील सर्व स्तोत्रातील  पाण्याच्या नमुन्याची दररोज तपासणी करावी.

महावितरण कंपनीने रोहित्रांची तसेच विद्युत वाहक तार तपासणी करावी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी पथक नेमावे.  असेही यावेळी श्री. सुपनेकर यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून तसेच मंदीर समितीकडून आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी गर्दीच्या ठिकाणी संभाव्य धोके लक्षात घेता आवश्यक उपाययोजना  करण्यासाठी  पोलीस प्रशासनाकडून  तयारी करण्यात आल्याची माहिती दिली.

तत्पूर्वी श्री सुपनेकर यांनी प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र,घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मदीर परिसर, तसेच 65 एकर या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close