जेष्ठ पत्रकार आयु.बा.ना.धांडोरे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न !
स्मरणिका प्रकाशन व सन्मान पत्र प्रदान सोहळा संपन्न!

जेष्ठ साहित्यीक बा.ना.धांडोरे साहेबयांचा 70वा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचा सपत्निक सन्मान जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे सर,डाँ. प्रा.संघप्रकाश दुड्डे, डाँ. प्रा. सारिपुत्र तुपेरे यांचे हस्ते करण्यात आला
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-जेष्ठ पत्रकार आयु.बा.ना.धांडोरे यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराचे वतिने त्यांचा सपत्नीक सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले व यानिमीत्त “आठवणीतील बा.ना..”स्मरणिका प्रकाशन व सन्मान पत्र प्रदान सोहळा “विठ्ठल इन “सभागृह येथे.संपन्न झाला.
या सोहळ्याचे आयोजन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, यांचे हस्ते पत्रकार सिध्दार्थ ढवळे सर, यांचे अध्यक्षतेखाली व डाँ. प्रा.संघप्रकाश दुड्डे,(सोलापूर) डाँ. प्रा. सारिपुत्र तुपेरे(सोलापूर) यांचे उपस्थित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार आयु.बा.ना.धांडोरे व त्यांच्या पत्नी आयु.मिनलताई यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.त्यानंतर विलास जगधने सर यांनी बुध्दवंदना घेतली व सर्वानी सामुहिक त्रिशरण,पंचशिल ग्रहण केले.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार डाँ. प्रा.वामनराव जाधव,आर.डी.चंदनशिवे व आप्पाराव धांडोरे यांनी केला. .त्यानंतरआयु.बा.ना.धांडोरे व त्यांच्या पत्नी आयु.मिनलताई यांच्या जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर केक कापून टाळ्याच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला.
(संयोजन समितीचे सिकंदर ढवळे सर,नाथन केंगार,गौतम सरतापे ,सुनिल वाघमारे, आर.डी.चंदनशिवे, डाँ. प्रा. वामनराव जाधव दादासाहेब दोडके सर,श्रीकांत कसबे,विलास जगधने सर,जैनुद्दीन मुलाणी, प्रा.शिवाजीराव वाघमारे, डाँ. प्रा.रामदास नाईकनवरे, आर पी.कांबळे यांचे हस्ते “सन्मान पत्र” देऊन गौरव करण्यात आला)
यावेळी सत्कार समितीच्या वतिने “सन्मानपत्र’देऊन उभयतांचा गौरव करण्यात आला. बा.ना.प्रेमी मित्रानी व कुटुंबातील सदस्यानी आपल्या आठवणी लिखित स्वरुपात पाठविल्या होत्या त्या संग्रहित करुन “आठवणीतील बा.ना..”हि स्मरणिका जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे व युवा राष्टचेतनाचे संपादक जैनुद्दीन मुलाणी यांनी संपादीत केली होती.त्या स्मरणीकीचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
(यावेळी संपादक श्रीकांत कसबे व जैनुद्दीन मुलाणी यांनी संपादीत केलेल्या “आठवणीतील बा.ना.”या स्मरणीकीचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे सर,डाँ. प्रा.संघप्रकाश दुड्डे, डाँ. प्रा. सारिपुत्र तुपेरे डाँ. प्रा.रामदास नाईकनवरे यांचे हस्ते करण्यात आले
संपादक श्रीकांत कसबे यांनी आपले स्मरणीकेबाबत मनोगत व्यक्त केले.यानंतर गणेश धांडोरे सर,प्रा.भास्कर बंगाळे,आप्पाराव धांडोरे, डाँ. प्रा.सारिपुत्र तुपेरे. प्रा.संघप्रकाश दुड्डे, योगीराज वाघमारे,यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आयु.बा.ना.धांडोरे यांनी सत्काराला उत्तर दिले. शेवटी पत्रकार सिध्दार्थ ढवळे सर यांनी अध्यक्षिय भाषण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल वाघमारे यांनी तर सुत्रसंचलन व सन्मानपत्र वाचन विक्रम बिस्किटे सर यांनी केले.आभार डाँ. प्रा.रामदास नाईकनवरे यांनी मानले. शेवटी विवीध संस्था व व्यक्ति द्वारे आयु.बा.ना.धांडोरे व त्यांच्या पत्नी आयु.मिनलताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास सामाजिक, साहित्यक्षेत्रातील अनेक मान्यवरासह बा.न.धांडोरे यांचा मित्र परिवार, नातेवाईक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संयोजन समितीचे सिकंदर ढवळे सर,नाथन केंगार,गौतम सरतापे ,सुनिल वाघमारे, आर.डी.चंदनशिवे, डाँ. प्रा. वामनराव जाधव दादासाहेब दोडके सर,श्रीकांत कसबे,विलास जगधने सर,जैनुद्दीन मुलाणी, प्रा.शिवाजीराव वाघमारे, डाँ. प्रा.रामदास नाईकनवरे, आर पी.कांबळे आदीनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.