Uncategorized

पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांची राहण्याची सोय संतछाया भक्तनिवास येथे होणार”…..आ. रोहित पवार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर(प्रतिनिधी) संतछाया भक्त निवास.वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या राहण्याची मोफत सोय उपलब्ध होणार आहे.अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी संतछाया भक्तनिवास भूमिपूजन प्रसंगी दिली.
तसेच डॉ. आप्पासाहेब पवार वारकरी आरोग्य सेवा योजना या योजनेतून सर्व वारकरी भक्तांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.या ठिकाणी भक्तनिवास व्हावे अशी ईच्छा सर्व भक्तांची होती ती आज पुर्ण करण्याचा योग आला.
सर्व संताच्या विचारात ताकद होती सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता ही वारकरी संप्रदाय मध्ये आहे.भेदभाव हा या वारकरी संप्रदायात नसतो.माणूसकीचे नाते याठिकाणी जपला जातो.
स्वराज्य ध्वज संकल्पना मांडली त्याला सर्व संतांनी आशिर्वाद दिला. हा ध्वजसंपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरला.या ध्वजाचे सर्वत्र पूजन करण्यात आले. हा खर्ड्यातील हा भगवा ध्वज संपूर्ण जगात सर्वात मोठा ध्वज आहे.
सर्व संतांनी सर्व लोकांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे. हाच उद्देश सर्व संतांनी आपल्या समोर मांडला. जामखेड कर्जत मतदारसंघात आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मुलांना मिळावे .म्हणून प्रयत्न करत आहोत. पाऊसाचे पाण्याचे नियोजन केले जात आहे. पाऊसाचे पाणी तेथेच कसे मुरले जाईल हे पाहिले जात आहे. संपूर्ण जगात शेतीविषयक काय अधुनिक बदल होत आहे.याचा पाठपुरावा करून शेतीत बदल केले जात आहे असे अनेक प्रगतशील प्रयोग केले जात आहे.
आध्यात्मिक क्षेत्रात चांगले सोयी उपलब्ध करण्याचे काम वारकरी संप्रदाय करु शकतो.
कर्जत जामखेड मतदारसंघात प्रत्येक गावात आरोग्य सेवा योजना राबवले जात आहेत. मतदारसंघातील संताची तसेच मंदीर या मतदारसंघात आहेत. सर्व मंदीराला मदत व पुरातन मंदीराला अ,ब,असा दर्जा दिला जात आहे.
या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील भक्तांच्या राहण्याची व्यवस्था या संतछाया भक्त निवास येथे केली जाणार आहे.
वटवृक्षाचे पारंब्या ज्याप्रमाणे असंख्य वाढतात. त्याप्रमाणे भक्तांची संख्या आणि सुविधा उपलब्ध होत जाणार आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व भाविक भक्तांच्या निवासाची तसे त्यांच्या उपचाराची या संतछाया भक्तनिवास येथे होणार आहे
असे मनोगत आमदार रोहित पवार यांनी संतछाया भक्तनिवास भूमीपूजन प्रसंगी व्यक्त केले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close