Uncategorized

सकल मराठा समाज संत पेठ यांच्या वतीने संत पेठ पंढरपूर येथे मराठा समाज वधूवर परिचय मेळावा आयोजित या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 

श्रीकांत कसबे

पंढरपूर( प्रतिनिधी) सकल मराठा समाज संतपेठ च्या वतीने आयोजित पंढरपूर येथील संत पेठ येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने वधूवर मेळावा आयोजित करून मराठा समाजातील उपवर मुलंमुली तसेच घटस्फोटीत,विधवा,विधूर अशा सर्व प्रकारच्या मुलामुलींचे वधूवर मोफत परिचय मेळावा आज रोजी दिनांक३/४२०२२ संपन्न झाला.
या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलमुली या वधूवर परिचय मेळाव्यास शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला नवयुवती नवयुवक एकूण ३२३हे नवयुवक आणि नवयुवती या ६०तसेच विधवा मुली.१३विधूर मुले२५ आणि सोडचिठ्ठी झालेल्या मुली या १२,तसेच सोडचिठ्ठी झालेले मुले.१७ असे एकूण ४५०एवढ्या संख्येने मुलंमुलीनी आपला सहभाग नोंदवला.
या वधूवर परिचय मेळाव्याला आलेल्या लोकांची जेवणाची सोय ही उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी केली
या कार्यक्रमाला उपस्थित मराठा समाजातील मान्यवर पंढरपूर न.पा.चे माजी नगरसेवक संजय निंबाळकर, सुधीर धुमाळ, शेखर भोसले,हेमंत पवार सर,रविराज गायकवाड, दिगंबर सुडके,हेमंत माने,अविनाश केंदळे,अमित पवार, विलास भोसले,गायकवाड सर,माजी नगरसेवक मालोजी शेंबडे,शेळके गुरुजी, दादा क्षिरसागर, अक्षय माने प्रशांत धुमाळ, संपादक शंकरराव कदम सा.धन्यवाद.शनी घुले,रामेश्वर सातपुते, रोहित भोसले,शिवाजी भोसले महाराज,विक्रांत बोडके, जयदीप माने,अँड.सत्येन धुमाळ, सुशेन गरड यांनी सुत्रसंचालन केले.
या मेळाव्यास मराठा समाजातील विविध जिल्ह्यातील पालक व नवयुवती, नवयुवक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close