महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध धर्मातील धर्मगुरूंच्या व्याख्यानमालेसह विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन”

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
अमरावती :(जि.प्र.)
सामाजिक क्रांतीचे आद्यप्रणेते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी पूर्णाकृती पुतळा परिसर स्वच्छ करून महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे प्रा. श्रीकृष्ण बनसोड ,(अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ ,अमरावती ), प्रा.अरुण बा. बुंदेले, ( अध्यक्ष ,कै मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान, अमरावती ), प्राचार्य श्री दत्तात्रय गणगणे, प्राचार्य श्री टी.एफ. दहिवाडे ,समाजसेविका रजिया सुलताना, उत्तमराव भैसने, रामकुमार खैरे, गोविंद फसाटे , सुधीरकुमार घुमटकर, दलितमित्र शालिनी मांडवधरे,
कमलाकर धोंगडे यांच्यासह फुले- शाहू-आंबेडकरांचे अनेक अनुयायी आदरांजली अर्पण करतील.
दि.११ एप्रिल २२ रोजी सकाळी महात्मा फुले जयंतीनिमित्त वऱ्हाड विकासाच्या वतीने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील वाचनालयाला १०१ वाचनीय पुस्तकांचे दान कारागृह अधिक्षक
श्री भारत भोसले यांना देण्यात येईल. या प्रसंगी माजी कारागृह अधिक्षक श्री के.एम. धोंगडे यांच्यासह इतर मान्यवर महात्मा फुले यांना अभिवादन करतील.
महात्मा फुले यांचे क्रांतिकार्य सकळ मानव जातीच्या उद्धारासाठी, सर्वांच्या न्याय्य हक्कांसाठी व मानवतेसाठी हाेते. महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानावर विचारमंथन व्हावे या उद्देशाने प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच हिंदू ,मुस्लिम,शीख, ख्रिश्चन व बौद्ध इत्यादी धर्मातील धर्मगुरूंच्या व्याख्यानमालांचे सोमवार दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सायं.४.०० वाजता सावता सभागृह, रामनगर अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे .सर्वधर्मीय व्याख्यानमालेत महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधक प्रा.पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य म. पुरुषोत्तमदादा कारंजेकर, मुस्लीम धर्मगुरू प्राचार्य अब्दुल अजीज रजवी ,ख्रिश्चन धर्मोपदेशक ब्र.डिकन क्रिसलर,बौद्ध धम्मगुरू भदंत महास्तवीर बुद्धघोष , शीख धर्म प्रचारक भाई भूपेंद्रसिंह रागी गुरुद्वारा , अमरावती आदी विचारवंत महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकतील. याप्रसंगी महात्मा फुले समाजसेवा पुरस्कार श्री.सत्यप्रकाश गुप्ता यांना प्रदान करण्यात येईल. अखिल भारतीय माळी महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस
श्री सुभाष सातव यांचा सत्कार तसेच टि. व्ही. कलाकार मिर्झा रफीबेग अहमद हे विनोदी वऱ्हाडी कविता सादर करतील . समाजसेविका रजिया सुलताना समारोपीय समालोचन करतील तर उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे बीजभाषण करतील .कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले हे महात्मा फुलेंच्या “अखंडा”चे व स्वरचित “क्रांतिसूर्य ” या वंदन गीताचे गायन करुन कार्यक्रमाचा ओनामा करतील.
या महात्मा फुले जयंती उत्सवाचे उपेक्षित समाज महासंघ ,सर्वशाखीय माळी महासंघ ,सावता खेळ व क्रीडा मंडळ व वऱ्हाड विकासच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९७६३४०३७४८ या भ्रमणध्वनी वर संपर्क करण्याचे व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी आयोजन सभेमध्ये पदाधिकारांच्या उपस्थितीत एका पत्रकाद्वारे कळविले आहे.