Uncategorized

ऊर्जा समस्या ही मानवा समोरील प्रमुख आव्हान होय – डॉ. श्रीनिवास कुलकर्णी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर – “विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या प्राचीन संकल्पना असून त्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये सापडतो. ऊर्जासमस्या हे मानवी समूहा समोरील प्रमुख आव्हान असून त्यांच्यावर संशोधकांनी काम करणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणात उर्जेची भूमिका महत्त्वाची असल्याने त्याची मागणी वरचेवर वाढत जाणारी आहे. नैसर्गिक स्त्रोतांपासून मर्यादित स्वरुपात उर्जेची निर्मिती होते. उर्जेची अक्षय निर्मिती होण्यासाठी सौर ऊर्जा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याच्यावर अधिक संशोधन झाल्यास उर्जेची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.” असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड
लिंकेज चे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय विज्ञान दिवस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
डॉ. श्रीनिवास कुलकर्णी पुढे म्हणाले की, “मानवी जीवनातील उर्जेची समस्या ही नॅनो सायन्स व नॅनो टेक्नोलॉजीच्या सहाय्याने सहज सोडवली जावू शकते. नॅनो सायन्स व नॅनो टेक्नोलॉजीच्या या सर्वसमावेशक संकल्पना असून ती प्रत्येक क्षेत्राशी निगडीत आहे. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “प्रकाशाचे किरण पारदर्शक पदार्थावर पडले असता ते विखुरतात व विखुरलेल्या प्रकाश किरणांची तरंगलांबी ही मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा वेगळी असते. या परिणामाला ‘रमण इफेक्ट’ असे म्हणतात. २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये सर सी. व्ही. रमण यांनी हा शोध लावला. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. ”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश शिंदे यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे तांत्रिक कामकाज डॉ. संजय चव्हाण यांनी पहिले. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, सिनिअर विभागातील शिक्षक , विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पांडुरंग घाडगे, प्रा. विजय खूळपे, प्रा. प्रशांत पिसे, प्रयोगशाळा परिचर नितीन नेहतराव, योगेश महिडा यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. योगेश पाठक यांनी मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close