Uncategorized

कलावंतांना त्रास देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची गय करणार नाही

पुरोगामी  संघर्ष परिषदेचे महासचिव मारुतीराव बोभाटे यांचा इशारा

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या बँड ,बेंजो व इतर कलावंत आघाडीच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास भेट प्रसंगी प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे, प्रदेशकार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, विजय सावंत, रणजीत माने इत्यादी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

संपादक-श्रीकांत कसबे

*सातारा*:- कोरोना काळात जगायचं कसं ?,काढलेलं कर्ज फेडायचं कसं?, मुलाबाळांना वाढवायचं कसं? अशा अनेक प्रश्नांच्या जाळ्यात सापडलेल्या बँड बेंजो सहीत इतर कलावंतांच्या जगण्याच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलीस खाते मात्र उ ला टू लावून कलावंतांना विनाकारण त्रास देत असेल व त्यांच्या गाड्या जप्त करून गुन्हे दाखल करत असेल आणि त्यांचा कामाचा खोळंबा होत असेल तर असं कारस्थान करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची यापुढे कसलीही गय केली जाणार नसून त्यांच्या निलंबनासाठी पुरोगामी संघर्ष परिषद रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा सणसणीत इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महासचिव मारुतीराव बोभाटे यांनी दिला ते पुरोगामी संघर्ष परिषदेच्या बँड ,बेंजो व इतर कलावंत आघाडीच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला भेट दिली त्या वेळी बोलत होते.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू होते.
यावेळी राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, बँड, बँजो व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत, जिल्हाध्यक्ष रणजीत माने, सचिन लोहार, शिवाजी पवार, निलेशभाऊ केंगार, दत्ता सोनवणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close