Uncategorized

चळवळीनी राजकीय रंग घेतल्याने समाजाचं नुकसान- प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सवादे (ता.कराड)शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे,प्राचार्य बाळासाहेब साठे,शंकर चव्हाण, आधिक चव्हाण, सिमा साळुंखे इ.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सवादे- (ता.कराड)-आज पर्यंत पुरोगामी विचारांचा वारसा सांगत सामाजिक चळवळी चालवत असताना सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढा उभारण्याची दिशाभूल करून अनेक चळवळीच्या नेत्यांनी स्वार्थापोटी चळवळीला राजकीय रंग दिल्याने सामाजिक चळवळीची वाणवा होऊन समाजाचे फार मोठे नुकसान झालं असल्याची खंत व्यक्त करून भविष्यात पुरोगामी विचारावर संपूर्ण देशामध्ये अन्यायाच्या विरोधात सामाजिक चळवळीचा लढा उभारण्याची जबाबदारी पुरोगामी संघर्ष परिषदेवर असल्याची जाणीव राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी करून दिली. ते सवादे (ता.कराड)याठिकाणी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.


यावेळी बोलताना प्रा वायदंडे म्हणाले फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवत असताना समाजाला अन्यायाच्या विरोधात बंड करण्याची धमक आली पाहिजे तसे न झाल्यास ते चळवळीचे अपयश असेल.
स्वागत व प्रास्ताविक सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले. यावेळी प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते महिला आघाडीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले तर राज्य सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या हस्ते युवक आघाडीशाखाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य बाळासाहेब साठे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय साठे, पश्चिम महाराष्ट्राचे (वरिष्ठ)संघटक सुभाषराव साळुंखे, कराड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुकेशिनी साठे, कराड तालुका अध्यक्ष शंकरराव चव्हाण, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष(युवक) मुसा (भाई) मुल्ला यांची भाषणे झाली .
बँड बँजो व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. सीमाताई साळुंखे ,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा राधा कांबळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख दीपक शिंगे, कराड तालुका उपाध्यक्षा सौ. सीमा साठे, कराड तालुका कार्याध्यक्षा कुसुम साठे, कराड तालुका उपाध्यक्ष रमेश साठे, कराड तालुका सरचिटणीस आकाश नेटके, कराड तालुका (युवक) अध्यक्ष शंकर साठे, कराड तालुका कार्याध्यक्ष दीपक साठे ,आशाताई सागरे, वैशाली सागरे ,दीपिका साठे, वैशाली साठे, शोभा साठे, बबूताई सागरे ,उषाताई सागरे, शकुंतला सागरे, मनीषा सागरे, अनिता साठे, पुनम साठे ,वर्षा साठे ,वंदना साठे ,आशालता भोसले, शोभा साठे ,सविता साठे, जयश्री सागरे,शीतल साठे, नंदा थोरात, मधुकर साठे, संतोष साठे, महेश भोसले, शंकर साठे, शंकर (अण्णा )साठे आनंदा साठे, निलेश सागरे, तुषार साठे, कुणाल साठे, करण साठे, संकेत साठे ,वैभव साठे, प्रदीप साठे ,चंद्रकांत साठे, छाया ननावरे ,भारती साठे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार शंकर साठे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close