Uncategorized

केंद्र सरकार विरोधात  महाविकास आघाडीकडून निषेधआंदोलन !

केंद्ररकार दडपशाही करित असल्याचा अमरजीत पाटील यांचा आरोप

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- केंद्रातील भाजपा मोदी  – शहा सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक समाजाचे नेते आमदार नवाब मलिक यांना इडीने बेकायदेशीररित्या अटक केल्याच्या निषेधार्थ आज पंढरपूरातील छत्रपती शिवाजी चौक येथे काॅंग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी मोदी – शहांच्या कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन  छत्रपति शिवाजी चौकाचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी  काँग्रेस तालुकाध्यक्ष  अमरजीत पाटील यांनी  केंद्र सरकार दडपशाही करत असुन  केंद्रीय संस्थाचा गैर वापर  करत असल्याचा आरोप  करुन निषेध व्यक्त केला. केंद्रसरकारकडुनकेंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेधासाठी  महाविकास आघाडीकडून आंदोलन पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमरजित पाटील,  केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेधासाठी  महाविकास आघाडीकडून आंदोलन   यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष ॲड.राजेश भादुले,राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर भोसले,तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख,शिवसेना शहराध्यक्ष रविंद्र मुळे,शहर उपाध्यक्ष तानाजी मोरे,काॅंग्रेस उपाध्यक्ष राहुल कौलगे पाटील,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,काॅंग्रेस सरचिटणीस राजाभाऊ उराडे,जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर,काॅंग्रेस महिला तालुकाध्यक्षा लोळगेताई,सरचिटणीस किशोर जाधव,देवानंद इरकर,राष्ट्रवादीचे विजय काळे,गिरीष चाकोते,यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.तहसिलदार यांना केंद्र सरकारच्या दडपशाहीबद्दल निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मोठ्ठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close