लातुर येथे 3 मे रोजी भरणार 5 वे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातुर-बीसेफ प्रणित अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या 5 व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी साहित्य परिषदेची लातूर जिल्हा कार्यकारीणीसह नियोजन समितीची बैठक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका डॉ सुधाताई कांबळे यांच्या अध्यक्षते खाली व जेष्ठ कवी शेषराव शिंदे , साहित्य परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व्यंकट दंतराव, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात ज्ञानरचना_स्कुल_जुना औसा रोड लातूर* येथे पार पडली.त्यात हा निर्णय घेण्यात आला..अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यंकट दंतराव राज्य कार्याध्यक्ष ‘आण्णा भाऊ साहित्य परिषद महाराट्र राज्य यांनी दिली.
सदर संमेलनात उद्घाटन सत्र,परिसंवाद,कथाकथन,कवीसंमेलन
व समारोप असे पाच सत्र असतील.उद्घाटन सत्रात संमेलनाच्या उद्घाटनासह “स्मरणिका प्रकाशन व 10 पुस्तकांचे प्रकाशन” करण्यात येईल तर समारोपाच्या सत्रात
साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. सदर नियोजन बैठकीला
साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश हणमंते महासचिव प्रा.रामकिशन समुखराव, डॉ बालाजी समुखराव, अंगद कांबळे,प्रवीण वलांडे,प्रा.सुरेश समुखराव,रंजना चव्हाण,बालाजी कोळी यांच्यासह साहित्य परिषदेचे जिल्हा व तालूका कार्यकारीणी सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.







