Uncategorized

एनडीएमजे च्यावतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपन्न !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातसुद्धा मागासवर्गीयांबरोबर भेदभाव------वैभव गिते / स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणारी एकमेव संघटना एन.डी.एम.जे होय---ऍड.केवल उके

 

राज्य महासचिव अँड. केवल उके

राज्यसचिव वैभव गिते

प्रमुख पाहुणे सौ.प्रणितीताई भालके व सौ.उज्वलाताई भालेराव

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने पंढरपूर हॉटेल विठ्ठल इन येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज,संत शिरोमणी रविदास महाराज,संत गाडगेबाबा, राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्री,त्यागमूर्ती रमाई यांच्या संयुक्त जयंतीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या घोषणा देत रॅली हॉटेल विठ्ठल इन येथे पोचली.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंतरजातीय विवाह मसुदा कायदा समितीचे मंत्रालयीन सदस्य ऍड.डॉ.केवल उके व राज्य सचिव वैभव गिते यांचे हस्ते  महापुरुषांचांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  उद्घाटन झाले.याप्रसंगी सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या महिलांना जिजाऊ, सावित्री ,रमाई हा मौल्यवान पुरस्कार बहाल करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुषांना फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीस भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमात खालील मागण्या शासनाकडे करण्यात आल्या-

पुरस्कार प्राप्त मान्यवर व पदाधिकारी

मागण्या पुढील प्रमाणे….
1)अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रगतीचा योजनांचा निधी इतरत्र वळऊ नये अखर्चित ठेऊ नये म्हणून बजेटचा कायदा करावा
2) अँट्रोसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात यावी
3) अँट्राँसिटी ऍक्ट व्यवस्थित कार्यान्वित होण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी.
4) अनुसूचित जाती-जमाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात यावा.
5) राज्यातील सर्व खून प्रकरणातील कुटुंबांचे पुनर्वसन होण्यासाठी आकस्मिकता योजना लागू करावी
6) बौद्ध,दलित आदिवासी यांचे 443 खून झाले आहेत या सर्व खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून शासकीय नोकरी जमीन व पेंशन देऊन पुनर्वसन करावे.
7) दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत बदल करून भूमिहीनांना जमिनी द्याव्यात
8) बौद्ध अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्याच्या योजनेस 100 कोटी रुपये द्यावेत.
इत्यादी ठराव पारित करण्यात आले.
उपस्थित महिलांना महिला व बालकांचे कायदे व त्याबाबतची माहिती सोप्या भाषेत समजण्यासाठी एन.डी.एम.जे संघटनेच्या वतीने पुस्तिका भेट देण्यात आली.यावेळी भारतनाना भालके प्रतिष्ठान च्या संचालक सौ.डॉ.प्राणितीताई भगीरथ भालके,पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा उज्वलाताई भालेराव,समाजसेविका निशाताई देवमारे, बौद्ध धम्माच्या प्रचारक व्याख्यात्या सुरेखा भालेराव,आरोग्य अधिकारी प्रभा साखरे या महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून एन.डी.एम.जे संघटनेच्या उपक्रमांचे स्वागत करून आंबेडकरी चळवळ गतिमान करन्यासाठी संघटनेने कधीही हाक दिल्यास सोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणार्या पुरुषांचा फुले,शाहु,आंबेडकर, आण्णाभाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुत्र संचालन रोहित एकमल्ली यांनी तर प्रास्ताविकात जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक यांनी संघटनेच्या वतीने गोरगरिबांच्या घरकुलांसाठी शासकीय जागा मिळऊन देऊन मिनी ट्रॅक्टर मिळऊन देणारी तसेच बांधकाम मजूर,असंघटीत कामगार ऊसतोड मजुरांसाठी काम करणारी एकमेव संघटना असल्याचे सांगितले. केले.

 

जिल्हाउपाध्यक्ष धनाजी शिवपालक

सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी संघटनेची ध्येयधोरणे सांगून स्वतःचा जीव धोक्यात घालून पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणारी व न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झटणारी संघटना असल्याचे यावेळी सांगितले.तरुणांनी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एन.डी.एम.जे संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे या ऍड.केवल उके यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुद्धा बौद्ध दलित आदिवासींच्यावरील अन्याय अत्याचारात भरघोस वाढ झाल्याचे सांगत अनेक योजनांचा बोजवारा व धक्कादायक आकडेवारी सांगितली.वैभव गिते यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करून राज्यकर्त्यांना अनेक प्रश्न विचारले.व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात बौद्ध दलित आदिवासी यांच्याबरोबर भेदभाव होत असल्याचे उदाहरणासह सांगितले.अँड.सुमित सावंत,अँड..वैभव धाइंजे,पंचशिलाताई कुंभारकर,शिवराम दादा कांबळे, दिलीप आदमाणे, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे,वैभव काटे,अजिनाथ राऊत यांनी मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास दादा धाइंजे यांनी पंढरपूर व सांगोला तालुक्यातील नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन पुढील काळात राज्यातील महिलांची स्थिती यावर कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले.

सुत्रसंचलन रोहित एकमल्ली

आभार बळीराम वाघमारे यांनी करून सांगता केली.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे,शाशीभाऊ खंडागळे,मराठवाडा सचिव संजय माकेगावकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे प.म.उपाध्यक्ष सचिन झेंडे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद सावंत, अविनाश ताकतोडे,बळीराम वाघमारे,विशाल ननवरे,वासुदेव साठे,परमेश्वर गेजगे,अनिल नवगिरे,बबन नवगिरे,लखन सावंत,रुपेश वाघमारे,स्वप्नील जाधव,अमित गायकवाड, मुरलीधर गायकवाड,सागर शिंदे, महेश कांबळे,सुनिता खलसे, राजश्री गेजगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close