पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी सविता पानपाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
उल्हासनगर:- (कल्याण) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उल्हासनगर शहराध्यक्षपदी (सह्याद्रीनगर दत्त मंदिर ई विंग ३०२) येथील सौ. सविता हिरामण पानपाटील यांची निवड करण्यात आली असून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी उपाध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांनी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे सहीचे पत्र त्यांना नुकतेच दिले.
निवडीनंतर सौ सविता पानपाटील म्हणाल्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात सुद्धा महिलांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत शहरी जीवन धावपळीचं असल्यामुळे महिलांच्या समस्याकडे कुणीच लक्ष देत नसल्यामुळे भविष्यात महिलांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, पुरोगामी संघर्ष परिषदेची शहरीभागात भक्कम पायाभरणी करणार असल्याचे म्हणाल्या त्यांच्या निवडीमुळे परिसरामध्ये कौतुक होत आहे.





