Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिलाआघाडीचे सातारा येथे शिवरायांना अभिवादन !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सातारा:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने सातारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी सज्जनगड येथून शिवज्योत आणून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा वनिता जाधव यांचे नेतृत्वाखाली शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली व सातारा येथील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अरुणा लोखंडे, जयश्री साळुंखे, मनीषा फाळके,दिपाली सासे, मनीषा गुजर, प्रभावती कोळी, निर्मला काटकर, शोभा सरतापे, हर्ष लोखंडे, माही लोखंडे, आरोही, ऐश्वर्या काटकर ,शैला मोरे इत्यादी महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close