Uncategorized

कासेगाव  येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-दि १९ फेब्रुवारी रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर कासेगाव मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला‌.हा जयंती उत्सव सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पंढरपूर तालुका खजिनदार  अमोल हिरालाल खिलारे सर यांनी आयोजित केला होता .या कार्यक्रमाची सुरुवात शिवमुर्ति पुजन करून केली नंतर शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर समाजातील ज्या मातापित्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे आशा आदर्श माता पिता यांचे सत्कार करण्यात आले.

व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, खाऊवाटप, वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप , कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह (दादा) देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यानंतर पितांबर कापसे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग खिलारे सर यांनी मनोगत व्यक्त केले व अध्यक्ष भाषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष  विजयसिंह (दादा )देशमुख यांनी केले.

 

यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य  दाजी खिलारे ,अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन खिलारे, पितांबर कापसे ,मार्गदर्शक बाबुराव खिलारे ,महादेव वाघमारे ,रुक्मिणी इंटरप्राईजेस चे मालक  .भिकाजी वाघमारे ,अध्यक्ष.प्रभाकर खिलारे बापू सुखदेव वाघमारे, बाळासाहेब हेगडे ,कालिदास खिलारे ,चंद्रकांत जाधव, युवराज इंगळे ,नामदेव खिलारे ,सुनील खिलारे ,बाबासाहेब खिलारे,,अभिषेक खिलारे ,अतुल खिलारे ,नितीन खिलारे  अजित खिलारे ,महादेव खिलारे ,संतोष खिलारे, अमोल रणदिवे इत्यादी मान्यवर माता बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य प्रवीण जाधव सरांनी केले .

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close