अक्कलकोट येथे फकिरा दलाचे वतीने शिवजंयती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अक्कलकोट:- आण्णाभाऊ साठे नगर माणिक पेठ अक्कलकोट येथे फकीरा दल व मातंग समाज कडून कुळवाडी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त मातंग समाजाचे अध्यक्ष निवृत्ती पारखे आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मढीखांबे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी मनसे संघटक देवेंद्र शिंदे, वंचित शहराध्यक्ष विशाल ठोंबरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी भावी नगरसेवक किसन भाऊ जाधव, नागेश भाऊ जाधव मित्र मंडळ,सुरेश पारखे, भानुदास महाराज देडे, वंचित शहर महासचिव भारत देडे, आरपीआय शहराध्यक्ष सुरेश सोनकांबळे,आरपीआय संघटक अंबादास शिंदे, बालाजी पारखे,रवी सोनकांबळे,स्वामी कोळी, सिद्धार्थ वरवटे,छोटू जाधव, सोनू देडे,यल्लाप्पा देडे नितीन पारखे संजय कामनळी सागर देडे आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्योतिबा (जय भाऊ) पारखे यांनी मानले.






