पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अश्वरुढ पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम,मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार सुशील बेल्हेकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, माजी नगरसेवक संजय निंबाळकर, डी राज सर्वगोड, विवेक परदेशी, सुजित सर्वगोड,विजय वरपे,प्रशांत शिंदे,अमोल डोके, मालोजीराजे शेंबडे, धर्मराज घोडके,बसवेश्वर देवमारे, प्रविण माने , बशिर तांबोळी, सुभाष मस्के ,नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्यधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर,रामचंद्र वाईकर,दर्शन वेळापुरे हे उपस्थितीत होते.