सबलीकरण योजनेसाठी आग्रही रहा अन्यथा मंत्रालयात घुसणार पुरोगामी संघर्ष परिषदेचा पालकमंत्र्यांना इशारा

पुरोगामी संघर्ष परिषदेचे शिष्टमंडळ सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करताना मारुतीराव बोभाटे, नितीनभाऊ तुपे, विजयभाऊ सावंत, शंकर चव्हाण इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना ही अनुसूचित जातीच्या लोकांना जमीन देण्याच्या उद्देशाने असून सदर योजनेमध्ये अनेक जाचक अटी असल्याने त्याचा लाभ मिळत नसून सदर योजनेसाठी आग्रही राहा.तसेच बँड व बँजो कलावंतांना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी लेखी परवानगी देऊन सुद्धां जिल्ह्यातील पोलिस स्टेशनचे कर्मचारी गाड्या आडवून दादागिरी करून पोलीस स्टेशन मध्ये आणतात याची चौकशी करा. अन्यथा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली थेट मंत्रालयातच घुसण्याचा ईशारा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य कार्यकारिणीतील शिष्टमंडळाने राज्याचे सहकार मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना दिला.
मंत्री बाळासाहेब पाटील सातारा रेस्टहाउस मध्ये आले असता सदर शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळाला मध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे महासचिव मारुतीराव बोभाटे, राज्याचे कार्याध्यक्ष नितीनभाऊ तुपे, राज्याचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा वनिता जाधव ,पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सुभाषराव साळुंखे ,बँड बँजो व इतर कलावंत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयभाऊ सावंत, सौ सुकेशनी साठे ,शंकरराव चव्हाण, पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सौ सीमा साळुंखे, सीमा साठे, कुसुंम साठे, सुरज रोकडे, शशिकांत गायकवाड, सचिन भिसे, शब्बीर शेख ,रमेश साठे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.